Dhananjay Munde Facebook Post | उपवास, नवस-पायी वाऱ्या करु नका, धनंजय मुंडेंचे समर्थकांना आवाहन

एकमेकांची काळजी घ्यावी. हेच माझ्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थनांचं काम करतील," असे आवाहन धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे केले. (Dhananjay Munde Facebook Post for Supporters)

Dhananjay Munde Facebook Post | उपवास, नवस-पायी वाऱ्या करु नका, धनंजय मुंडेंचे समर्थकांना आवाहन

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी राज्यभरातून त्यांच्या समर्थकांकडून प्रार्थना, नवस करत आहे. काहींनी तर उपवास, पायी भगवान गडावर जात आहे. “आपण सर्वांनी आहात त्या ठिकाणी राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे. एकमेकांची काळजी घ्यावी. हेच माझ्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थनांचं काम करतील,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे केले. (Dhananjay Munde Facebook Post for Supporters)

“मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत, काहीजण उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत; तुम्हा सर्वांचे माझ्यावरील ऋण वाढतच जात आहेत!

पण सहकाऱ्यांनो, असे काहीही करु नका. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा-आशीर्वादाने मी ठणठणीत बरा होऊन येणार आहे. कोणीही पायी चालत जाणे, उपवास करणे असे काहीही करू नका. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल? आपण सर्वांनी आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे, एकमेकांची काळजी घ्यावी, हेच माझ्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचं काम करतील,” अशी पोस्ट फेसबुकद्वारे धनंजय मुंडे यांनी पोस्ट केली.

धनंजय मुंडे यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील 136 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

12 जून रोजी धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. परळीतील जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र, मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळून आले होते. (Dhananjay Munde Facebook Post for Supporters)

संबंधित बातम्या : 

Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Dhananjay Munde COVID | आरोग्य मंत्र्यांचा धनंजय मुंडेंना फोन, प्रकृतीबाबत राजेश टोपे म्हणतात…

धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

Published On - 11:05 pm, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI