Gym Guidelines | व्यायाम करताना मास्कचे बंधन नाही, पण ‘हे’ महत्त्वाचे, जिम-योगा सेंटरसाठी केंद्राचे नियम

Gym Guidelines | व्यायाम करताना मास्कचे बंधन नाही, पण 'हे' महत्त्वाचे, जिम-योगा सेंटरसाठी केंद्राचे नियम

जिम किंवा योगा सेंटरमध्ये जाताना याबाबतच्या गाईडलाईन्स पाळणे गरजेचे असणार आहे. (Gym yoga Institutes Guidelines)

Namrata Patil

|

Aug 03, 2020 | 6:36 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अनलॉक 3’ ला सुरुवात झाली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑगस्टपासून देशभरात जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जिम आणि योगा केंद्राबाबतच्या सुरक्षात्मक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. जिम किंवा योगा सेंटरमध्ये जाताना याबाबतच्या गाईडलाईन्स पाळणे गरजेचे असणार आहे. (Gym yoga Institutes Guidelines)

🛑 जिम आणि योगा सेंटरमध्ये जाताना पाळण्याच्या काही  गाईडलाईन्स 

💠कंटेन्मेंट झोनमध्ये येणाऱ्या जिम तसेच योगा सेंटर सुरु करता येणार नाही. ज्या जिम किंवा योगा सेंटर कंटेन्मेंट झोनच्या बाहेर आहेत, फक्त त्याच सुरु करता येणार आहे.

💠प्रत्येक व्यक्तीचे तापमान चेक करणे आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक

💠केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले वेळेचे सर्व नियम पाळणे गरजेचे असेल.

💠65 वर्षांपेक्षा अधिक, गरोदर महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी.

💠जिम तसेच योगा करताना सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे असणार आहे. दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर आवश्यक असणार आहे.

💠जिम आणि योग सेंटरच्या परिसरात असताना तोंडावर मास्क घालणे गरजेचे असेल, मात्र जिममध्ये व्यायाम किंवा योग करताना मास्क घालण्याचे बंधन नसेल.

💠जिम आणि योगादरम्यान कमीत कमी 60 सेकंद हात धुणे गरजेचे असेल. सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक

💠परिसरात थुंकण्यास सक्त मनाई असेल.

💠आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे गरजेचे

💠जर एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर त्याने जवळच्या आरोग्य केंद्रात जावे.

💠नाक तोंड पुसताना टिश्यू पेपरची विल्हेवाट लावणे आवश्यक

🛑 योगा सेंटर किंवा जिम सुरु करण्यापूर्वी हे गरजेचे

  • योगा आणि जिम सुरु करण्यापूर्वी आवश्यक जागा असल्याची खात्री करा. तसेच जिममधील मशिन तसेच इतर साहित्यात पुरेसे अंतर ठेवा.
  • जर जिम बाहेर पुरेशी जागा असेल तर त्या ठिकाणी काही मशिन ठेवू शकता.
  • जिम तसेच योगा सेंटरमध्ये जाण्या-येण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग असावे.
  • जिमची फी भरण्यासाठी Contactless सिस्टिमचा वापर करावा.
  • जिम मधील एसीचे तापमान हे 24-30 डिग्री दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • जिममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असावी.
  • लॉकरचा वापर करतेवेळीही सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन व्हावे.
  • तसेच जिम किंवा योगा सेंटर असणार परिसरात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असणार आहे. वॉशरुम, शौचालय यासह इतर सामनांचेही निर्जंतुकीकरण करावे.  (Gym yoga institutes guidelines)

संबंधित बातम्या : 

Unlock 3 Guidelines : देशभरात जिम पुन्हा सुरु होणार, अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी

Amit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें