AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा, उपायुक्तांवर खुर्ची उगारली

कोरोना रुग्णांची दररोज संख्या वाढत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका कार्यालयात आज (26 जून) तुफान राडा घातला (MNS dispute in Aurangabad Municipal office).

औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा, उपायुक्तांवर खुर्ची उगारली
| Updated on: Jun 26, 2020 | 5:58 PM
Share

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची दररोज संख्या वाढत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका कार्यालयात आज (26 जून) तुफान राडा घातला (MNS dispute in Aurangabad Municipal office). यावेळी औरंगबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी महापालिका उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत गैरवर्तण केलं. दशरथ यांनी उपायुक्तांच्या अंगावर खुर्ची उगारली. मात्र, पोलिसांनी वेळीच अडवलं. अन्यथा प्रकरण जास्त चिघळलं असतं (MNS dispute in Aurangabad Municipal office).

औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. शहरात दररोज 200 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीला औरंगाबाद महापालिका प्रशासन दोषी असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी महापालिका कार्यालयात शिरुन संताप व्यक्त केला.

रुग्ण वाढत आहेत. तुम्ही झोपा काढत आहात का? असा सवाल सुहास दशरथे यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना विचारला. यावेळी त्यांनी संतापात उपायुक्तांशी गैरवर्तन केलं. महापालिकेने दोन दिवसात योग्य उपाययोजना नाही केल्या तर आंदोलन करु, अशा इशारादेखील दिला.

हेही वाचा : मुंबई-चंद्रपूर प्रवास, ‘फादर्स डे’च्या पार्टीतही सहभाग, कोव्हिड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर गुन्हा

“औरंगाबादमध्ये सुरुवातील दिवसाला 10 रुग्ण वाढायचे. त्यानंतर 20 झाले, 20 नंतर 50, त्यानंतर 100, आता दररोज 250 रुग्ण वाढत आहेत. दररोज 250 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असतील तर महापालिका प्रशासन झोपलेलं आहे का? आम्ही कुंभकर्णालासुद्धा उठवून आणलं आहे. या कुंभकर्णाला झोपलेलं प्रशासन उठवायला सांगितलं आहे. अशीच जर परिस्थिती राहिली तर महापालिका प्रशासनाविरोधात मनसे मोठं आंदोलन करेल”, असा इशारा सुहास दशरथे यांनी दिला.

“आज उपायुक्त वाचले. अन्यथा त्यांचा आज कार्यक्रमच केला असता. ज्या पद्धतीने आज महापालिका प्रशासन काम करत आहे, ते अत्यंत नींदनीय आहे. त्यांचा मी निषेध करतो”, असा घणाघात दशरथे यांनी केला.

“फक्त कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारने महापालिकेत आयएस अधिकारी नियुक्त केले पाहिजेत. एक अधिकारी ग्रामीण भागासाठी तर दुसरा अधिकारी शहरासाठी नियुक्त केला पाहिजे”, असं सुहास दशरथे म्हणाले.

हेही वाचा : मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार 

“नाशिक, मालेगावसारख्या शहरात कोरोना नियंत्रणात येतो. पुण्यासारख्या शहरात परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मग या संभाजीनगर शहरामध्ये का नियंत्रणात येत नाही? झोपले आहेत का सगळे?”, असा सवाल सुहास दशरथे यांनी केला.

“आम्ही लोकप्रतिनिधींनादेखील इशारा देतो. त्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. पण काय केलं? त्यांच्यांच सोयीसाठी ते एकत्र आले होते. काय निर्णय घेतले? सर्वांनी समोर येऊन त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे कोणतीही गोष्ट खपवून घेणार नाही”, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

“आम्ही आता आंदोलनाला उभे राहू. प्रत्येक क्वारंटाईन सेंटरला जाऊ. प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि नागरिकांच्या अडचणी आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही”, असंदेखील सुहास दशरथे म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.