AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unlock 3 | देशभरात सिनेमागृह, जिम पुन्हा सुरु होण्याची शक्यता

माहिती व प्रसारण मंत्रालयाने सिनेमा हॉल पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे ठेवला आहे

Unlock 3 | देशभरात सिनेमागृह, जिम पुन्हा सुरु होण्याची शक्यता
| Updated on: Jul 26, 2020 | 6:57 PM
Share

नवी दिल्ली : अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील सिनेमागृह, जिम पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे साडेचार महिन्यांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गजबजण्याची चिन्हं आहेत. (Movie Halls Gyms likely to start in Unlock 3)

‘कोव्हिड19’ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला ‘अनलॉक 2’ येत्या शुक्रवारी (31 जुलै) संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढील टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात आहे. ऑगस्टपासून अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिनेमा हॉल 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे बोलले जाते. सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे पालन करुन काही नियमावली यासाठी आखली जाऊ शकते.

माहिती व प्रसारण मंत्रालयाने सिनेमा हॉल पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे ठेवला आहे. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी त्यांनी प्रमुख सिनेमागृहांच्या मालकांशी चर्चा केली होती.

थिएटर मालक 50 टक्के आसन क्षमतेसह थिएटर पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. मात्र केंद्रीय मंत्रालयाने सुरुवातीला 25 टक्के क्षमतेसह थिएटर सुरू करण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे सुचवले आहे.

दुसरीकडे, व्यायामशाळा आणि जिम पुन्हा सुरु करण्याची मागणीही जोर धरत आहे. त्यामुळे केंद्र सरकार काही निर्बंधांसह जिम पुन्हा उघडण्यास सशर्त परवानगी देण्याच्या तयारीत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

‘अनलॉक 3’ मध्ये काही निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. शाळा आणि मेट्रो सेवा देशभरात बंद राहण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यांशी सल्लामसलत केली.

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत यापूर्वी पालकांकडून अभिप्राय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर, पालक शाळा पुन्हा सुरु करण्याच्या पक्षात नाहीत, असे मंत्रालयाने म्हटले. (Movie Halls Gyms likely to start in Unlock 3)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.