करणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय, भावडांकडून चौघांच्या हत्येची सुपारी

मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी मारुती लक्ष्मण गवळी या 70 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

करणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय, भावडांकडून चौघांच्या हत्येची सुपारी
Nupur Chilkulwar

|

Oct 14, 2020 | 6:37 PM

मुंबई : समाजातील लोकांनी करणी केल्याने वडिलांचा मृत्यू झाला, असा समज करुन दोन भावांनी (Mulund Police Solved Murder Case) समाजातील चार जणांच्या हत्येचा कट रचला. यातून एका वृद्धाची हत्या देखील झाली. मात्र, इतर तिघांची हत्या होण्यापूर्वीच मुलुंड पोलिसांनी या भावांसह हत्येची सुपारी घेणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत (Mulund Police Solved Murder Case).

नेमकं प्रकरण काय?

मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी मारुती लक्ष्मण गवळी या 70 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येत मुलुंड पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नव्हता. मात्र, मारुती हे जोगवा मागत असत, त्यामुळे या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास केला. यावेळी त्यांच्या समाजातील काही लोकांनी यात अंधश्रद्धेचा अँगल असल्याचे पोलिसांना सांगितले. गेल्या महिन्यात त्यांच्याच समाजातील कन्हैय्या मोरे या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलांना यात समाजातील काही लोकांनी करणी केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची संशय होता. त्यांच्या अंतविधीसाठी समाजातील जे चार जण उपस्थित नव्हते त्यांनीच आपल्या वडिलांवर करणी केली असावी, असा संशय या मुलांना होता. त्यामुळे या भावंडांनी त्या चार जणांची हत्या करण्याचं ठरवलं.

हे दोघे भाऊ अभिलेखावरील गुन्हेगार असल्यामुळे त्यांनी या चार जणांच्या हत्येची सुपारी देण्यासाठी घाटकोपर मानखुर्द गोवंडी याठिकाणी अभिलेखावरील गुन्हेगारांची निवड केली. मोहम्मद आसिफ नासिर शेख, मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी, मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान आणि शहानवाज ऊर्फ सोनू अखतर शेख यांना चार जणांच्या हत्येसाठी 70 हजार रुपयांची सुपारी दिली (Mulund Police Solved Murder Case).

2 ऑक्टोबरला या टोळीने या चौघांमधील मारुती गवळी यांची हत्या केली. त्यानंतर दुसरा व्यक्ती गावाला गेल्याने त्याचा हत्येचा प्लान केला. तसेच, इतर दोघांच्या हत्येचा कट रचला. मात्र, मुलुंड पोलिसांनी वेळेतच या हत्येचा छडा लावल्याने इतर तिघे बचावले.

या प्रकरणी पोलिसांनी या भावांसह सुपारी घेणाऱ्या चौघांना अटक केली आहे. मात्र अजून ही 21 व्या शतकात अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रुतली गेली आहेत, हे या घटनेवरून स्पष्ट होते.

Mulund Police Solved Murder Case

संबंधित बातम्या :

भटक्या कुत्र्याने केला हत्येचा उलगडा, चार तासात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

पुण्यात वाळू सप्लायरवर गोळीबार, गोळी गालाला लागून गेल्याने थोडक्यात बचावला

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें