AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या लग्नात अडथळा, आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून

इगतपुरी तालुक्यातील कातोर वाडी येथे मुलीच्या लग्नात अडथळा नको म्हणून आईने मुलीच्या प्रियकराचा खून घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Murder of daughters Lover by mother).

मुलीच्या लग्नात अडथळा, आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून
| Updated on: Jun 15, 2020 | 8:38 AM
Share

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कातोर वाडी येथे मुलीच्या लग्नात अडथळा नको म्हणून आईने मुलीच्या प्रियकराचा खून घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Murder of daughters Lover by mother). काही दिवसांपूर्वीच ओंडली शिवारात संबंधित युवकाचा मृतदेह सापडला होता. यानंतर घोटी पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास करुन उलगडा केला. यात मुलीच्या कुटुंबीयांनीच लग्नात अडथळा नको म्हणून तिच्या प्रियकराची क्रूर हत्या केल्याचं उघड झालं. संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळन्यात घोटी पोलिसांना यश आलं आहे. पंडित ढवळू खडके असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 दिवसांपूर्वी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील ओंडली शिवारात एका 20 वर्षाच्या युवकाचा पाय आणि प्रेताचा सांगाडा कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे या युवकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने या मृतदेहाची ओळख पटवणं आणि त्याच्या मृत्यूचे कारण समजणं कठीण झालं होतं. दरम्यान तपासात हा मृतदेह इगतपुरी जवळील तळेगाव शिवारातील कातोरेवाडीच्या युवकाचा असल्याची खात्री पोलिसांना झाली.

अखेर तपासात गावातीलच एका महिलेने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने या युवकाचा खून केल्याचं उघड झालं. कातोरेवाडी येथील महिला चांगुणाबाई गणपत मेंगाळ यांच्या मुलीचे मृत युवक पंडीत खडके याच्यासोबत प्रेमविवाह होता. या प्रेमविवाहाला चांगुणाबाईचा विरोध होता. त्यात मुलीचे लग्न ठरल्याने मुलीच्या लग्नात तिचा प्रियकर अडथळा तयार करेल या संशयाने चांगुणाबाईने त्याच्या हत्येचा कट रचला. यात बोटोशी येथील विलास प्रथम गावंडा (चांगुणाबाईच्या पहिल्या घराचा मुलगा) याच्यासह अन्य तिघांच्या मदतीने पंडित खडके याचा काटा काढण्याचा कट तयार करण्यात आला. यानुसार 26 मे रोजी संशयितांनी वैतरणा रोडवरील ओंडली शिवारात पार्टी करण्याच्या निमित्ताने पंडित खडकेला बोलावले. या ठिकाणी त्याला गाफील ठेवत त्याचा गळा दाबून खून केला. यानंतर मृतदेहाची विल्हेवाटही लावली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंग, अप्पर अधीक्षक वालावलकर, उपअधीक्षक अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी घोटी पोलिसांनी चांगुणाबाई गणपत मेंगाळ (रा. तळेगाव, कातोरेवाडी), विलास प्रथम गावंडा (रा. बोटोशी, ता मोखाडा) यांच्यासह कैलास जेठू फसाळे (रा. कोचाळे, ता. मोखाडा), प्रकाश नवसु झुगरे (रा. करोळ), राजू रामदास ठोंबरे (रा. खंबाळेवाडी, ता. इगतपुरी) यांना अटक केली. त्यांच्याविरोधात भादंवी 302, 506, 201, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह एएसआय अनिल धुमसे, हवालदार शीतल गायकवाड सुहास गोसावी, दीपक खैरनार हे करत आहेत. याप्रकरणी संशयितांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू, घातपात की आत्महत्या?

तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन

दुबईतील खजूराच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी, जेएनपीटी बंदरातून 11 कोटींचं घबाड जप्त

Murder of daughters lover by mother

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.