AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!

नागपुरातील हॉटस्पॉट मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच (Nagpur Corona New Hotspot) आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!
| Updated on: Jun 02, 2020 | 2:11 PM
Share

नागपूर : नागपुरातील हॉटस्पॉट मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच (Nagpur Corona New Hotspot) आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नागपुरातील काही नवीन भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. गड्डीगोदाम, नाईक तलाव, लोकमान्य नगर, टिमकी या भागात रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आज नागपुरात नव्या 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 571 वर पोहोचला आहे.

नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाची चिंता (Nagpur Corona New Hotspot) वाढली आहे. तर दुसरीकडे नागपुरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आज 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही 383 वर पोहोचली आहे. तर नागपुरात कोरोनामुळे 11 जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.

नागपुरात कोरोनाचे नेमकी परिस्थिती काय?

  • एकूण रुग्ण संख्या – 571
  • एकूण बरे झालेल्यांची संख्या – 383
  • एकूण मृत्यू – 11

नागपूर शहरात आता बऱ्यापैकी सूट मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसून येत आहे. अनेक व्यवहार सुद्धा सुरु झाले. नागपूरचं जनजीवन रुळावर येत असलं तरी वाढत असलेली रुग्णसंख्या बघता जनतेनेचे आपली सुरक्षा घेण्याची गरज आहे.

नागपुरात काय घडतयं?

  1. नागपुरात सकाळी 12 कोरोना रुग्णांची भर, कोरोनाबधितांचा एकूण आकडा 571 वर
  2. नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनाची लागण, कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील इतरांची कोरोना चाचणी
  3. नागपुरात दोन दिवसांत 38 नव्या कोरोना रुग्णांची भर, प्रशासनाच्या चिंतेत वाढ
  4. मोमीनपुरा परिसरात काल आठ नव्या रुग्णांची नोंद, इंदोरा, जुनी मंगळवारी, वाठोड्यातंही कोरोनाचा शिरकाव
  5. पोलीस, डॉक्टर आणि इतर कोरोना योध्यांची कोरोना चाचणी करा, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सरकारला आदेश
  6.  नागपुरात 3 जूनपासून लॉकडाऊनमध्ये अनेक अंशी शिथिलता, दिशा आणि तारखेनुसार दुकानं उघडणार
  7. बुटीबोरी येथील कर्मयोगी फाउंडेशनच्या अन्नदानाचा पुरणपोळीच्या जेवणानं समारोप, 71 दिवसांत 17 हजार गरजूंना लाभ
  8. नागपुरातील न्यू नंदनवन, सदर आणि नरेंद्रनगरचा बाधित भाग सील करण्याचे आदेश, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
  9. शहरातील कोरोना प्रादुर्भाव संपेपर्यंत सॅनीडायझिंगचे काम सुरु ठेवा.
  10. सेवामुक्त केलेल्या मनपाच्या 60 कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांचे आंदोलन, कामावर परत घेण्याची मागणी

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

वर्ध्यातील 21 वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.