Balya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड

कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांड प्रकरणात नागपूर पोलिसांनी 24 तासात मुख्य सूत्रधारासह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Balya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड

नागपूर : कुख्यात गुंड बाल्या बिनेकर हत्याकांड प्रकरणात नागपूर पोलिसांनी 24 तासात (Balya Binekar Murder Case) मुख्य सूत्रधारासह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी चेतन हजारेने जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Balya Binekar Murder Case).

या प्रकरणी पोलिसांनी चेतन हजारे, रजत तांबे, भरत पंडित या तीनही आरोपींना रामटेकमधून अटक केली.

नागपूरच्या भोले पेट्रोल पंप चौकात काल सिनेस्टाईल खूनकरुन हे आरोपी फरार झाले होते. या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा उलगडा केला आणि तीनही आरोपींना अटक केली.

बाल्या बिनेकरती सिनेस्टाईल हत्या

नागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची काल (26 सप्टेंबर) पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली होती. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोले पेट्रोल पंपाजवळ घडली होती (Balya Binekar Murder Case).

बाल्या बिनेकराचं नागपुरात सावजी भोजनालय आहे. त्याचबरोबर तो जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर काही हल्लेखोर पाळत ठेवून होते. हल्लेखोरांनी बाल्या बिनेकरच्या कारमागे बाईकने पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळ आल्यावर त्यांनी बाल्याची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी बाल्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बाल्या बिनेकरचा जागीच मृत्यू झाला.

नागपुरात याआधीदेखील अशाप्रकारचे घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नागपुरात एकीकडे कोरोनाचा कहर असताना गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. याआधी 3 ते 4 जून दरम्यान 24 तासात तीन हत्येच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं.

Balya Binekar Murder Case

संबंधित बातम्या :

शिर्डीत तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला ‘बॅड टच’, डॉक्टरला बेड्या

गर्भाचं लिंग तपासण्यासाठी बायकोचं पोट फाडलं, उत्तर प्रदेशमधील पाच मुलींच्या बापाचं कृत्य

तू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे ‘खयाली पुलाव’, वादावादीतून तरुणाची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI