तू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे ‘खयाली पुलाव’, वादावादीतून तरुणाची हत्या

'तू करोडपती होणार' असा फेक कॉल नागपूरच्या युवकाला आला आणि मित्रांनी त्याची हत्या केली.

तू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे 'खयाली पुलाव', वादावादीतून तरुणाची हत्या

नागपूर : ‘तू करोडपती होणार’ असा फेक कॉल नागपूरच्या युवकाला आला (Nagpur Fake Call And Murder) आणि मित्रांनी त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे (Nagpur Fake Call And Murder).

यश ठाकरे, इम्तियाज अली, शेख असीम शेख रशीद हे तिघंही मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. ते काही गुन्ह्यांखील जेलमध्येही जाऊन आले होते. यश ठाकरे याला त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि ‘तू करोडपती बनणार’, असं त्याला त्या कॉलवर सांगितलं. ही गोष्ट त्याने आपल्या मित्रांना सांगितली. मात्र, ‘आम्ही तुझ्या सोबत राहतो, मग तुला मिळणाऱ्या पैशात आम्हाला पण हिस्सा दे’, अशी मागणी केली (Nagpur Fake Call And Murder).

यशने ती मागणी फेटाळली आणि इतर मित्रांच्या मनात द्वेष निर्माण झाला. त्यानंतर या मित्रांनी यशला वाठोडा परिसरातील खुल्या मैदानात बोलावलं. तिघांनी त्या ठिकाणी गांजाचं सेवन केले आणि नशेत पुन्हा हिस्सा देण्याचा विषय निघाला. त्यावरुन या तिघांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर भांडणात झालं. इम्तियाज, शेख असीमने यशवर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर त्या दोघांनी तेथून पळ काढला.

एका फेक कॉलमुळे मित्रांच्या मनात लोभ आला आणि त्यांनी आपल्याच मित्राची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी इम्तियाज अली, शेख असीम शेख रशीद यांना अटक केली आहे.

Nagpur Fake Call And Murder

संबंधित बातम्या : 

भाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या

मास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं, गावगुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यालाही मारहाण

रात्री पतीसोबत भांडण, पत्नीची 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी

Published On - 1:06 pm, Sun, 20 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI