Yavatmal Corona Update | यवतमाळला वाढता विळखा, कोरोनाबाधितांची संख्या 40 वर

यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Yavatmal Corona Update) आहेत.

Yavatmal Corona Update | यवतमाळला वाढता विळखा, कोरोनाबाधितांची संख्या 40 वर

यवतमाळ : यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच (Yavatmal Corona Update) आहे. यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. मात्र आतापर्यंत 10 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने, सध्या यवतमाळमध्ये 30 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

नुकतंच पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या सर्व व्यक्ती एकाच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्या (Yavatmal Corona Update) आहेत. यात तीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेले हे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती आहेत.  त्यांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला आज (25 एप्रिल) प्राप्त झाले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत यवतमाळमध्ये 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. तर त्यापैकी 10 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत यवतमाळमध्ये 30 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

यवतमाळमध्ये चार दिवस पूर्ण बंद

त्याआधी यवतमाळमध्ये काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे यवतमाळ शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 24 एप्रिलच्या दुपारी 12 वाजल्यापासून 27 एप्रिल 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहेत.

गुरुवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. वरील बंदच्या काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषध दुकाने पशुवैद्यकीय दवाखाने आणि त्यांची औषध दुकाने 24 तास सुरु राहतील. तसेच दुधाची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुखाद्याची दुकाने सकाळी 6 ते 9 या वेळात, पेट्रोलपंप सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवेकरीता पेट्रोलपंप 24 तास सुरु राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाणे व येण्याकरीता मुभा राहील. हाआदेश फक्त यवतमाळ शहराकरीता लागू राहतील.

यवतमाळ जिल्ह्यातील इतर शहरी ग्रामीण भागाला हे आदेश लागू राहणार नाही. त्या ठिकाणच्या मुभा देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा याआधी ठरवून दिलेल्या वेळेनुसारच सुरू राहतील. वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 च इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद  (Yavatmal Corona Update)  आहे.

Published On - 4:00 pm, Sat, 25 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI