‘सविता भाभी, तू इथंच थांब’, ‘शिवडे आय अॅम सॉरी’नंतर पुण्यात नवी पोस्टरबाजी

'शिवडे, आय एम सॉरी' या पोस्टरबाजीनंतर पुण्यात आता 'सविताभाभी' हे नाव घेऊन पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

'सविता भाभी, तू इथंच थांब', 'शिवडे आय अॅम सॉरी'नंतर पुण्यात नवी पोस्टरबाजी


पुणे : एकीकडे पुण्याला बेकायदेशीर होर्डिंगनं घेरलं असताना दुसरीकडे कोणाचंही थेट नाव न घेता करण्यात येणारी पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरबाजीची राज्यभरात चर्चा झाली. त्यानंतर आता ‘सविताभाभी’ हे नाव घेऊन पोस्टरबाजी करण्यात आली आहे (Posters of Savita Bhabhi in Pune).

महाराष्ट्रात पुणे जसं शिक्षणाचं माहेरघर, आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, तसंच त्याच्या आणखीही काही ओळखी आहेत. या शहरातील प्रत्येक घरासमोर लावलेल्या विशेष संदेश देणाऱ्या पाट्यांनीही पुण्याला अशीच एक ओळख दिली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे देखील सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘शिवडे आय एम सॉरी’नंतर पुण्यातील म्हात्रे पुलासह अनेक भागामध्ये ‘सविता भाभी, तू इथंच थांब’ अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

पुण्यातील रस्त्यांवर लागलेले “सविताभाभी, तू इथंच थांब….” असा मजकूर असणारे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमी असलेल्या या पोस्टरवर इतर काहीही लिहीलेले नाही. त्यामुळे हे पोस्टर कोणी आणि का लावले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, यापूर्वी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरची चर्चा झाली होती. पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती. हा देखील अशाच प्रसिद्धीचा प्रकार असू शकतो, असंही बोललं जात आहे. मात्र सध्या या फ्लेक्सवरुन सोशल मीडियात मात्र भन्नाट चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्याची एक ओळख म्हणजे भन्नाट पाट्यांचं शहर. यातच भर म्हणून आता अशा पोस्टरबाजीने पुण्याला नवी ओळख मिळते आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ:


Posters of Savita Bhabhi in Pune

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI