अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 50) चौपदरीकरणाच्या कामात 29 प्रकारच्या 2 हजार 373 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केला आहे (NGT order inquiry of Tree cutting in Sangamner ). तसेच तोडलेल्या प्रत्येक झाडामागे 10 झाडं लावण्याच्या नियमालाही केराची टोपली दाखवल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडेही (NGT) दाद मागितली असून त्यांनी या प्रकरणी गठीत समितीला 6 आढवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे चौपदरीकरणाच्या कामात वृक्षतोड करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (NHAI) आपण झाडे लावली पण शेतकऱ्यांनी नासधूस केल्याची सारवासारव केली आहे.