नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले

अहमदनगर:  केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे चक्कर येऊन कोसळले. अहमदनगरमधील राहुरी इथं ही घटना घडली. नितीन गडकरी हे आज  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांना चक्कर आल्याने ते कोसळले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. राहुल कृषी विद्यापीठात आज पदवीदान समारंभ अर्थात दीक्षांत सोहळा होता. […]

नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अहमदनगरकेंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे चक्कर येऊन कोसळले. अहमदनगरमधील राहुरी इथं ही घटना घडली. नितीन गडकरी हे आज  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांना चक्कर आल्याने ते कोसळले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राहुल कृषी विद्यापीठात आज पदवीदान समारंभ अर्थात दीक्षांत सोहळा होता. या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र यादरम्यानच कार्यक्रमस्थळी त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. नेमकं काय घडतंय हे कुणालाच काही कळलं नाही. गडकरी कोसळल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली.

अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात मुळा नदीच्या काठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.

दरम्यान, प्रवासाच्या दगदगीमुळे गडकरींना चक्कर आली असावी, असा अंदाज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. गडकरींना दोन वेळा चक्क आली. भाषण संपवून ते जागेवर येत असताना त्यांना अस्वस्थ वाटलं. त्यानंतर राष्ट्रगीताला उभं राहण्यापूर्वीही चक्कर आल्याचं समजतं.

सध्या गडकरींची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना विश्रांतीची गरज आहे. गडकरी विशेष विमानाने नागपूरला रवाना झाले आहेत. पुढील तीन दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

नेमकं काय घडलं?

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी यांनी समारंभात 30 ते 35 मिनिटं भाषण केलं. भाषण केल्यानंतर ते व्यासपीठावरील त्यांच्या खुर्चीकडे आले. थोड्याच वेळात राष्ट्रगीत सुरु होणार होते. त्यासाठी खुर्चीच्या येथे गडकरी उभे राहिले होते. तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि दोनवेळा भोवळ आली. त्यानंतर तातडीने ते खुर्चीवर बसले. सुरक्षारक्षक धावत गडकरींच्या जवळ आले आणि त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही नितीन गडकरी यांना बसण्यासाठी आधार दिला. त्यानंतर राज्यपालांची गडकरींना पिण्यासाठी पाणी दिलं. तातडीने कृषी विद्यापीठातच डॉक्टरांनी नितीन गडकरी यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नितीन गडकरी कृषी विद्यापीठातून निघाले.

नितीन गडकरी हे कृषी विद्यापीठातून आपल्या गाड्यांच्या ताफ्यातून निघाले. यावेळी नितीन गडकरी यांच्या गाडीतच राज्यपालही बसले आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी पुढील दौरा रद्द करुन हेलिकॉप्टरने नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुढील तीन दिवसांचे गडकरींचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महत्त्वाचे नेते सोडून, इतर कार्यकर्त्यांनी भेटू नये, असेही सांगण्यात आले आहे.

नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नितीन गडकरी हे पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय झाले. नंतर भारतीय जनता पक्षात सक्रीयपणे काम करु लागले. सर्वसामान्य कार्यकर्ता ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, असा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास आहे. महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या काळात गडकरींनी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं. सध्याच्या मोदी सरकारमध्ये सर्वात आश्वासक चेहरा म्हणून नितीन गडकरी परिचीत आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.