तब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण पूर्णत्वाच्या मार्गावर

तब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण पूर्णत्वाच्या मार्गावर

राम मंदिरासाठी तब्बल 27 वर्षे पायात चप्पल न घालणाऱ्या कोल्हापूरच्या कारसेवकाचा पण आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. (Kar Sevak of Kolhapur who not wear slippers)

सचिन पाटील

|

Aug 05, 2020 | 10:54 AM

कोल्हापूर : देशभरात आज राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह आहे. अयोध्या नगरीत बहुप्रतीक्षित राम मंदिराचा भूमिपजून सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. अयोध्येपासून देशाच्या कानाकोपऱ्यात रामनामाचा जयघोष होत आहे. इकडे कोल्हापूरमधील एक कारसेवकाचा अनोखा पण पूर्ण होणार आहे. राम मंदिरासाठी तब्बल 27 वर्षे पायात चप्पल न घालणाऱ्या कोल्हापूरच्या कारसेवकाचा पण आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. (Kar Sevak of Kolhapur who not wear slippers)

कोल्हापूर जवळील शिये गावातील कारसेवक निवास पाटील यांची अनोखी राम भक्ती आहे. आयोध्येत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा त्यांनी संकल्प केला होता. तब्बल 27 वर्ष अनवाणी पायाने निवास पाटील फिरत आहेत. (Kar Sevak of Kolhapur who not wear slippers)

मंदिराचा कलश रोहन झाल्यानंतरच पायात चप्पल घालण्याचा त्यांचा निर्धार आहे. कारसेवक निवास पाटील हे 1992 च्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी आज राम मंदिर भूमिपूजननिमित्ताने घरातच प्रभू रामचंद्राच्या प्रतिमे पूजन केलं.

अयोध्या राममंदिर भूमिपूजन सोहळा

ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. (Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program Live Update) यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीतून अयोध्येकडे रवाना झाले.

संबंधित बातम्या 

Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला रवाना 

Ayodhya Ram Mandir Photos: भूमिपूजनाच्या आधीच अयोध्‍येत दिवाळी, योगींनी फटाके फोडले, तर शिवराज चव्हाणांची रुग्णालयात पूजा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें