नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द; प्रशासनाचा तातडीने निर्णय

मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होत आहे. आगामी काही दिवसांतही कोरोनाचा प्रसार वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द; प्रशासनाचा तातडीने निर्णय
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:21 PM

नवी मुंबई : मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होत आहे. आगामी काही दिवसांतही कोरोनाचा प्रसार वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना चाचण्या वाढवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (number of corona patient Increased in Navi Mumbai, leave of medical officers has been canceled)

मागील आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली होती. मात्र, गुरुवारी हीच संख्या 175 वर गेली. ही आकडेवारी लक्षात घेता नवी मुंबई पालिका प्रशासन दक्ष झाले आहे. कोरोनाग्रस्तांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत पालिकेने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर आगामी दोन दिवसांत प्रतिजन तसेच आरटीपीसीआर चाचण्या वाढवून त्यांचे प्रमाण चार हजारपर्यंत नेण्याचा विचार सुरु असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

रुजू असलेले असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकारी सेवेवर कायम ठेवण्यात आले आहेत. आगामी काळात त्यांना मिळणाऱ्या रजा सुद्धा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. कंत्राटी सेवेत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनादेखील कायम ठेवण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. शहरात सध्या दोन हजार आठशे प्राणवायू रुग्णशय्या तयार ठेवण्यात आल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. तर अत्यवस्थ रुग्णांसाठी 450 रुग्णशय्या विविध रुग्णालयांत सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले. आगामी दोन दिवसांत या सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संर्गाचे हे प्रमाण लक्षात घेता नवी मुंबई महापलिका आयुक्त बांगर यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगली पाहीजे. मार्केट परिसरात मास्क नाही, प्रवेश नाही ही मोहीम आपल्या सर्वांनी प्रभावीपणे राबवली पाहिजे, असे आवाहन बांगर यांनी व्यापारी आणि नागरिकांना केले आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत 46619 करोनाबधित आढळले आहेत. तर करोनामुक्तीचा 95 टक्के आहे. दिवाळीच्या आधी रुग्णसंख्या कमी होत असल्याने आरोग्य प्रशासन तसेच नागरिकांना दिलासा मिळत होता. मात्र, दिवाळी सण आणि एपीएमसी मार्केटमध्ये झालेली गर्दी पाहता आगामी काही दिवसांत रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी 175 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत एकूण 950 जणांचा मृत्यू झाला आहे. सहरात सध्या 1184 कारोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, अडीचशेचा टप्पा पार

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

Photo ! कोरोनाचा धोका; तरीही मुंबई ते दिल्ली खरेदीसाठी तुफान गर्दी

(number of corona patient Increased in Navi Mumbai, leave of medical officers has been canceled)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.