Photo ! कोरोनाचा धोका; तरीही मुंबई ते दिल्ली खरेदीसाठी तुफान गर्दी

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा, सॅनिजायझरचा वापर करा अशा सूचना सातत्याने प्रशासनाकडून केल्या जात आहेत. परंतु नागरिक त्याचं पालन करताना दिसत नाहीत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:35 PM, 12 Nov 2020
देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. परंतु नागरिकांनीदेखील काळजी घ्यायला हवी. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा, सॅनिजायझरचा वापर करा अशा सूचना सातत्याने प्रशासनाकडून केल्या जात आहेत. परंतु नागरिक त्याचं पालन करताना दिसत नाहीत. देशभरात अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करुन कोरोनाला आमंत्रण देत आहेत, असं चित्र पाहायला मिळत आहे.
प्रयागराजमध्ये 'धनत्रयोदशीनिमित्त' विविध बाजारांमध्ये लोकांनी भांडी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
सणासुदीच्या निमित्ताने गोव्यातील पणजी येथील बाजारांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली येथील सदर बाजार परिसरात खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती.
अहमदाबादमध्ये खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांची ठिकठिकाणी थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी केली जात आहे.
धनत्रयोदशीनिमित्त दिल्लीत लोकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
गर्दी ही मुंबई शहराची एक ओळख आहे. कोरोना महामारीच्या काळातही मुंबईतल्या गर्दीवर फार मोठा परिमाण झालेला नाही. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. आज मुंबईच्या दादर मार्केटमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळाली.