AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिहारच्या निवडणुकीत स्थलांतरित मजूर मतपेटीतून भाजपविरोधात रोष व्यक्त करतील’

सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस दल हे कसल्या तरी दबावाखाली वावरत होते. | Sanjay Nirupam

'बिहारच्या निवडणुकीत स्थलांतरित मजूर मतपेटीतून भाजपविरोधात रोष व्यक्त करतील'
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 18, 2020 | 9:10 AM
Share

पाटणा: बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राज्यातील स्थलांतरित मजूर भाजपविरोधात मतदान करुन आपला राग व्यक्त करतील, असे मत काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी व्यक्त केले आहे. बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून स्टार प्रचारक म्हणून केवळ संजय निरुपम यांचीच निवड केली होती. (Congress leader Sanjay Nirupam on Bihar elections 2020)

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे हे गरीब लोक खूप दुखावले गेले आहेत. लॉकडाऊनदरम्यान आपल्या गावांकडे परतत असताना अनेक मजुरांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या सगळ्याबद्दलचा राग ते मतपेटीतून व्यक्त करतील. भाजप आणि नितीश कुमार यांना याचा मोठा फटका बसेल, असे संजय निरुपम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या मुलाखतीत संजय निरुपम यांनी बिहार निवडणुकीत सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या सुरु असलेल्या राजकारणावरही टीकास्त्र सोडले. सुशांत सिंहने आत्महत्या केली होती, हे प्रथमदर्शनी दिसून आले होते. त्यामुळे या प्रकरणाचे बिहार निवडणुकीशी काहीही देणेघेणे नाही. तरीही राजकीय पक्षांकडून या प्रकरणाचा ज्याप्रकारे वापर केला जात आहे, ते दुर्दैवी असल्याचे निरुपम यांनी म्हटले.

मात्र, मुंबई पोलिसांकडून याप्रकरणात तितक्या तत्परतेने कारवाई झाली नाही. वरकरणी मुंबई पोलिसांना याप्रकरणाच्या तपासात फारसा रस नसल्याचे दिसत होते. मुंबई पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल आहे. परंतु, सुशांत प्रकरणात ते कसल्या तरी दबावाखाली वावरत होते. हा दबाव कोणाचा होता, हे मला माहिती नाही. मात्र, या सगळ्यामुळे सुशांतचे चाहते संतापले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याची मागणी केली, असे निरूपम यांनी सांगितले.

‘बिहार निवडणुकीत पंतप्रधान मोदी प्रमुख चेहरा असल्यास काँग्रेसला फायदाच होईल’ बिहार निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच भाजपचा प्रमुख चेहरा असेल तर काँग्रेसला याचा फायदाच होईल. ही राज्याची निवडणूक आहे. त्यामुळे याठिकाणी मोदी फॅक्टरचा फारसा परिणाम होणार नाही. गेल्या सहा महिन्यांत आर्थिक आघाडीवर केंद्र सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक मोदी सरकारचे पोस्ट लॉकडाऊन धोरण आणि नितीश कुमार सरकारचा अकार्यक्षम कारभार या दोन मुद्द्यांभोवतीच फिरेल, असे संजय निरुपम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

मोदी, शाहांसह फडणवीस करणार बिहारमध्ये प्रचार; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

(Congress leader Sanjay Nirupam on Bihar elections 2020)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...