भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला कोरोना

भारताला अणु बॉम्बची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद (Pakistan Minister Sheikh Rashid Ahmad) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला कोरोना

लाहोर : भारताला अणुबॉम्बची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद (Pakistan Minister Sheikh Rashid Ahmad) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षणे आढळलेले नाहीत. मात्र, त्यांनी स्वत: ला दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन करुन घेतलं आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे (Pakistan Minister Sheikh Rashid Ahmad).

शेख रशीद अहमद यांनी काही महिन्यांपूर्वी भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असताना भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती. “अणू युद्ध व्हावं, अशी पाकिस्तानची इच्छा नाही. मात्र, भारताने तशाप्रकारचं युद्ध लादलं तर पाकिस्तान तोडीसतोड उत्तर देणार. पाकिस्तानजवळ पाव आणि अर्ध्या पाव किलोचे अणुबॉम्ब आहेत, जे भारताच्या महत्त्वाच्या क्षेत्राला निशाणा बनवू शकतात”, अशी धमकी त्यांनी दिली होती.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना

दरम्यान, पाकिस्तानात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि मुस्लिम लीग पक्षाचे नेते शाहिद खाकान अब्बास यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनीदेखील स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे, अशी माहिती जियो न्यूजने दिली आहे.

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार

पाकिस्तानात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्यावर गेला आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात कोरोनाचा कहर सुरु आहे. पंजाबमध्ये 38 हजार 903 रुग्ण तर सिंध प्रांतात 38 हजार 108 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात आतापर्यंत 34 हजार 355 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातमी :

मास्क कुणी आणि केव्हा वापरावा, जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या गाईडलाईन्स

Published On - 9:14 pm, Mon, 8 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI