भारतावर 50 अणुबॉम्ब टाका: परवेज मुशर्रफ

अबू धाबी: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी भारतावर 50 अणुबॉम्ब टाकण्याचा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. यूएईमध्ये पत्रकारांशी बोलताना मुशर्रफ म्हणाले की, जर पाकिस्तानने भारतावर पहिला अणुहल्ला केला तर भारत 20 अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला नष्ट करेल. त्यामुळे पाकिस्ताननं भारतावर पहिल्यांदा 50 …

भारतावर 50 अणुबॉम्ब टाका: परवेज मुशर्रफ

अबू धाबी: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी भारतावर 50 अणुबॉम्ब टाकण्याचा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. यूएईमध्ये पत्रकारांशी बोलताना मुशर्रफ म्हणाले की, जर पाकिस्तानने भारतावर पहिला अणुहल्ला केला तर भारत 20 अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला नष्ट करेल. त्यामुळे पाकिस्ताननं भारतावर पहिल्यांदा 50 अणुबॉम्ब टाकून भारताला नष्ट केलं पाहिजे. पण, इम्रान खान यांची अण्वस्त्र वापरण्याची तयारी आहे का असाही प्रश्न मुशर्रफ यांनी विचारला.

मुशर्रफ काय म्हणाले?
“भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा एकदा ताणले आहेत. अणुहल्ला होणार नाही. मात्र जर भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत 20 अणुबॉम्ब टाकून आपल्याला (पाकिस्तान) संपवून टाकेल. त्यामुळे एकमात्र उपाय हाच आहे की आपल्याला पहिल्यांदा त्यांच्यावर 50 अणुहल्ले करायला हवेत, जेणेकरुन ते आपल्यावर 20 बॉम्ब टाकूच शकणार नाहीत. तुम्ही पहिल्यांदा 50 अणुबॉम्ब टाकायला तयार आहात का?” असं मुशर्रफ म्हणाले.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असलेले परवेज मुशर्रफ यांचं हे वक्तव्य पुलवामा हल्ल्याच्या दहा दिवसानंतर आलं आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या संघटनेने घेतली आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानची चहूबाजूंनी नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर नेशनचा दर्जा हटवला, आयात शुल्क वाढवलं, त्यानंतर पाकिस्तानला जाणारं भारताच्या वाट्याचं पाणीही बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला.

इम्रान खान यांची वल्गना

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. “स्वत: पाकिस्तान दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करुन आम्हाला फायदा काय” असा प्रश्न इम्रान खान यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुरावे द्या आम्ही कारवाई करु, अशी वल्गना केली.

संबंधित बातम्या

इम्रान खानची भारताला धमकी, अफगाणी नागरिकांनी पाकची अब्रू काढली  

इम्रान खान अपरिपक्व, पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींचा पलटवार  

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *