जिल्हा बंदी असताना पुण्यातून परभणीत, जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाला न्यायालयाचा दंड

जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णासह इतर 2 आरोपींना परभणी न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे (Fine to Corona patient for violating lockdown restriction in Parbhani ).

जिल्हा बंदी असताना पुण्यातून परभणीत, जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाला न्यायालयाचा दंड
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 8:39 PM

परभणी : जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णासह इतर 2 आरोपींना परभणी न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे (Fine to Corona patient for violating lockdown restriction in Parbhani ). परभणीचे मुख्य न्यायदंडाधिकारी महेश तिवारी यांनी हा निकाल दिला आहे. या रुग्णावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंध न पाळल्याचा आरोप होता. न्यायालयाने कोरोना संसर्गाचा धोका आणि नियमांचं उल्लंघन या मुद्द्यांवर गांभीर्याने दखल घेत या रुग्णाला दंड ठोठावला आहे.

संबंधित रुग्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असतानाही पुण्यातील भोसरीतून परभणीत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी देखील पॉझिटीव्ह आली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणीत पहिला कोरोना रुग्ण आढळला. यानंतर प्रशासनाने त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. तरुणाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले होते.

या प्रकरणी 3 जणांवर नवा मोंढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज दोषारोपपत्र दाखल केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी महेश तिवारी यांनी आरोपी गजानन पांचाळ, सचिन पांचाळ, मारोती पांचाळ या तिघांना या प्रकरणात दोषी मानले आणि प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला.

परभणीतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलं

दरम्यान, परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त बेडची संख्याही वाढलीय. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने 1 हजार 723 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी 723 बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या 1 हजार 106 बेड रिक्त आहेत. शिवाय शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतांश रुग्णालयांमध्ये 30 ते 40 बेड रिक्त आहेत.

हेही वाचा :

परभणीत राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

खा. संजय जाधवांनी राजीनामा दिलाच नाही, तर मागे घेण्याचा विषयच नाही : एकनाथ शिंदे

‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना

व्हिडीओ पाहा :

Fine to Corona patient for violating lockdown restriction in Parbhani

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....