Anurag Kashyap | अनुराग कश्यपची चौकशी संपली, 8 तासानंतर पोलिस स्थानकातून बाहेर

सकाळी 10 वाजता सुरू झालेले चौकशी सत्र संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास संपले आहे. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर अनुरागाची सुटका झाली आहे.

Anurag Kashyap | अनुराग कश्यपची चौकशी संपली, 8 तासानंतर पोलिस स्थानकातून बाहेर
Harshada Bhirvandekar

|

Oct 01, 2020 | 7:50 PM

मुंबई : पायल घोष प्रकरणी बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपला (Anurag Kashyap) आज (1 ऑक्टोबर) वर्सोवा पोलिस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अनुराग सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल झाला होता. सकाळी 10 वाजता सुरू झालेले चौकशी सत्र संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास संपले आहे. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर अनुरागची सुटका झाली आहे. अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. (Payal ghosh Case Anurag Kashyap Exit Versova police station after 8 hours interrogation)

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने पायलने (Payal Ghosh) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, तिला न्याय मिळेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले होते.

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. (Payal ghosh Case Anurag Kashyap Exit Versova police station after 8 hours interrogation)

रामदास आठवलेंसह पायलने घेतली राज्यपालांची भेट

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर काल (29 सप्टेंबर) रामदास आठवले, पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली.

‘राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे’, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

अनुरागने फेटाळले होते पायलचे आरोप

‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की, स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात सामील करून घेतलेस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकेच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले गेले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत’, असे ट्विट करत अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) सगळे आरोप फेटाळून लावले होते.

(Payal ghosh Case Anurag Kashyap Exit Versova police station after 8 hours interrogation)

संबंधित बातम्या : 

Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन

‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर

पायल-अनुराग वादात रामदास आठवलेंची उडी, पायल प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें