सलमानच्या ‘भारत’चं नाव बदलणार?, हायकोर्टात याचिका दाखल

Nupur Chilkulwar

|

Updated on: May 31, 2019 | 8:08 PM

मुंबई : अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘भारत’ हा वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या सिनेमाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमाचं टायटल बदलण्यासंबंधी ही याचिका आहे. त्यामुळे आता सलमानच्या ‘भारत’वर संकट ओढवलं आहे. सामाजिक कार्यकर्ते विपिन त्यागी यांनी ही याचिका दाखल केली. ‘भारत’ या शब्दाचा व्यावसायिकरित्या वापर करणे चुकीचे […]

सलमानच्या ‘भारत’चं नाव बदलणार?, हायकोर्टात याचिका दाखल

Follow us on

मुंबई : अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘भारत’ हा वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या सिनेमाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमाचं टायटल बदलण्यासंबंधी ही याचिका आहे. त्यामुळे आता सलमानच्या ‘भारत’वर संकट ओढवलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते विपिन त्यागी यांनी ही याचिका दाखल केली. ‘भारत’ या शब्दाचा व्यावसायिकरित्या वापर करणे चुकीचे आहे, असं विपिन त्यागी यांनी सांगितलं. या सिनेमाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना टायटल बलण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती त्यागी यांनी उच्च न्यायालयाकडे केली.

“हे टायटल कलम 3 अंतर्गत येणाऱ्या प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधित) [Emblems & Names (Prevention of Improper Use) Act, 1950] कायदाचंउल्लंघन आहे. या कायद्यांतर्गत कुठल्याही प्रकारच्या व्यवसायासाठी ‘भारत’ या शब्दाचा प्रयोग करणे कायद्याने गुन्हा आहे”, असं त्यागी यांनी सांगितलं.

‘भारत’ हे आपल्या देशाचं अधिकृत नाव आहे, त्यामुळे सिनेमाचं नाव बदलावं. तसेच या सिनेमात एक डायलॉग आहे ज्यामध्ये देशाची तुलना हिरोसोबत करण्यात आली आहे, हा डायलॉगही बदलण्यात यावा, अशी मागणी त्यागी यांनी केली आहे.

“दक्षिण कोरियाचा सिनेमा बघितल्यानंतर मला वाटलं की, या सिनेमाचं नाव आपल्या देशावर ठेवण्याचा काहीही अर्थ नाही. देशातील लोकांच्या भावनांचा व्यवसायासाठी वापर करण्याचा हा एक लाजीरवाणा प्रयत्न आहे”, अशी प्रतिक्रिया विपिन त्यागी यांनी दिली.

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा कोरियन सिनेमा ‘अॅन ऑड टू माय फादर’ चा रिमेक आहे. अतूल अग्निहोत्रीच्या रील लाईफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड आणि भूषण कुमारच्या टी-सीरीजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमाही सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणे ईदला म्हणजेच 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे, तर त्याच्याशिवाय या सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेत्री तब्बू, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटाणी, अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता सुनील ग्रोवर दिसणार आहेत. या सिनेमात सलमान खान पहिल्यांदा एका वृद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे.

VIDEO : 

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI