AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव, पत्रव्यवहार पाहणाऱ्या महिलेला लागण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव झाला (Pimpri-Chinchwad mayor Cabin one female Covid Positive) आहे.

Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव, पत्रव्यवहार पाहणाऱ्या महिलेला लागण
| Updated on: Jul 26, 2020 | 12:26 AM
Share

पिंपरी चिंचवड : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महापौर उषा ढोरे यांचा पत्रव्यवहार पाहणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Pimpri-Chinchwad mayor Cabin one female Covid Positive)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर महापौरांचा कक्ष आहे. या ठिकाणी दिवसभर अनेकांची वर्दळ असते. या कक्षातील महापौरांचा पत्रव्यवहार पाहणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना दोन दिवसांपासून त्रास होत होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

त्यानंतर त्यांनी चाचणी केल्यानंतर हा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुदैवाने संबंधित महिला कर्मचारी ही गेल्या शनिवारपासून घरीच होत्या, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात महापौर ढोरे यांनी कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

हेही वाचा – पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली. चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मोहोळ यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज 1 हजार 042 रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील एकूण रुग्णसंख्या 16 हजार 493 वर पोहोचली आहे.  (Pimpri-Chinchwad mayor Cabin one female Covid Positive)

संबंधित बातम्या : 

Murlidhar Mohol Corona | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग

कोरोनामुक्तीनंतर पुण्याच्या महापौरांचा पुन्हा धडाका, बेड्सचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.