जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारताचं मार्गक्रमण सुरु- पंतप्रधान मोदी

सागर जोशी

|

Updated on: Jan 04, 2021 | 12:01 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नॅशनल मेट्रोलॉजिकल कॉन्क्लेव्हचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत जगाचं नेतृत्व करण्यासाठी मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारताचं मार्गक्रमण सुरु- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नॅशनल मेट्रोलॉजिकल कॉन्क्लेव्हचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत जगाचं नेतृत्व करण्यासाठी मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच नव्या वर्षात भारताला दोन कोरोना लस मिळाल्या आहेत. भारतातील लसीकरण मोहीम ही जगातील सर्वात मोठी मोहीम असेल असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi address national metrological conclave)

नवं वर्ष देशासाठी अनेक नव्या संधी घेऊन आलं आहे. नव्या वर्षात देशाला 2 मेड इन इंडिया कोरोना लसी मिळाल्या आहेत. त्यासाठी मी वैज्ञानिकांचं अभिनंदन करतो, असं सांगत या वैज्ञानिकांवर आपल्याला अभिमान असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोना संकटाच्या काळातील या वैज्ञानिकांचं योगदान कायमस्वरुपी लक्षात राहील असंही मोदींनी म्हटलं.

‘आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करायचं आहे’

“आपल्याला फक्त भारतीय उत्पादनांनी जग भरायचं नाही, तर जगभरातील ग्राहकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचं आहे. आपल्याला ब्रँड इंडियाला क्वालिटी आणि क्वान्टिटी अशा दोन्ही पातळ्यांवर विश्वासपात्र ठरवायचं आहे. भारतीय वस्तू खरेदी करणाऱ्या प्रत्येकाचं मन आपल्याला जिंकायचं आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे गरजेचं आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

मेड इन इंडियाची ग्लोबल डिमांड, ग्लोबप स्वीकारार्हता या दिशेनं आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या देशात सरकारी सेक्टर असो की खासगी सेक्टरमधील सर्व्हिस क्वालिटी चांगली असायला हवी. आपलं क्वालिटी स्टँडर्ड जगभरात भारत आणि भारताच्या उत्पादनाची ताकद वाढवण्यासाठी गरजेचं आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.

भारताकडे स्वत:ची नेव्हिगेशन प्रणाली

आज भारत जगातील त्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वत:ची नेव्हेगिशन प्रणाली आहे. आज त्या मार्गाने अजून एक पाऊल पडलं आहे. आज ज्या भारतीय निर्देशकाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. तो आपल्या उद्योग श्रेत्राला क्वालिटी प्रॉडक्ट्स बनण्यासाठी प्रोत्साहित करेल, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे.

संबंधित बातम्या: 

आधी पंतप्रधान मोदींनीच लस टोचवून घ्यावी, काँग्रेस नेत्याचं आवाहन

Sourav Ganguly : पंतप्रधान मोदींचा गांगुलीच्या पत्नीला फोन, तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

PM Narendra Modi address national metrological conclave

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI