AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

130 कोटी भारतीयांनी टाळी-थाळी वाजवून संगीत अभियानाला सुरुवात केली : पंतप्रधान मोदी

सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक अॅण्ड कल्चर अमंगस्ट युथ’ (स्पिक मॅके) या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगभरातील लोकांना सोशल मीडियाद्वारे संबोधित केलं.

130 कोटी भारतीयांनी टाळी-थाळी वाजवून संगीत अभियानाला सुरुवात केली : पंतप्रधान मोदी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 01, 2020 | 11:30 PM
Share

नवी दिल्ली : ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक अॅण्ड कल्चर अमंगस्ट युथ’ (स्पिक मॅके) या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगभरातील लोकांना सोशल मीडियाद्वारे संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्पिक मॅके संस्थेचं कौतुक केलं. याशिवाय या संस्थेने आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमाची सुरुवात 130 कोटी भारतीय नागरिकांनी टाळी-थाळी वाजवून केली, असं मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

“या अभियानाची सुरुवात 130 कोटी भारतीयांनी टाळी-थाळी वाजवून केली. 130 कोटी भारतीयांनी शंकनाद, घंटानाद करुन संपूर्ण देशाला एक ऊर्जा दिली. 130 कोटी नागरिक एक भावनेने एकत्र येतात, एकसंघ जोडले जातात तर हा संघ एक संगीत बनतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

तीन वर्षांपूर्वीदेखील स्पिक मॅकेच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात संबोधित करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मी डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधला होता. मात्र, यावेळी संपूर्ण कार्यक्रमच ऑनलाईन डिजिटल माध्यमावर आयोजित करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या संकंटातही तुमचं धैर्य अबाधित राहिलं या गोष्टीचा मला आनंद झाला. विशेष म्हणजे तुम्ही परिस्थितीनुसार या कार्यक्रमाला आणखी जास्त प्रासंगिक केलं आहे.

संपूर्ण जगात कोरोनामुळे जो तणाव आहे, लोकांमध्ये असणाऱ्या भीतीला संगीत आणि कलेच्या माध्यमातून समाधान देऊ शकतो या विचाराने तुम्ही या वर्षाच्या कार्यक्रमाची थीम ठेवली आहे.

पूर्वी जेव्हा युद्ध छेडलं जायचं तेव्हा राज्यातील कवी, गायक, कलाकार वीररसचे गीत लिहायचे. संगीताला प्रेरणाचं माध्यम बनवायचे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूविरोधात आमचे कलाकारही तशीच भूमिका निभावत आहेत.

आमचे गायक, गीतकार, कलाकार यांनी देशाचं मनोबल वाढवण्यासाठी, देशाला जागरुक करण्यासाठी एक रचनात्मक अभियान सुरु केलं आहे. गेल्या काही दिवसात आम्ही असे कित्येक संगीतमय प्रयोग बघितले आणि ऐकलेदेखील आहेत.

या अभियानाची सुरुवात 130 कोटी भारतीयांनी टाळी-थाळी वाजवून केली. 130 कोटी भारतीयांनी शंकनाद, घंटानाद करुन संपूर्ण देशाला एक ऊर्जा दिली. 130 कोटी नागरिक एक भावनेने एकत्र येतात, एकसंघ जोडले जातात तर हा संघ एक संगीत बनतो.

संगीतात एक सामंजस्य आणि अनुशासनाची गरज असते तशाप्रकारचं सामंजस्य, संयम आणि अनुशासनाच्या मदतीने देशाचा प्रत्येक नागरिक या संकटाविरोधात लढत आहेत.

मानव जातीच्या इतिहासात संगीत आणि उत्सवांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभवली आहे. जगाच्या विविध भागात उत्सवांचे रुप वेगळे राहिले आहे. या उत्सवांमध्ये वेळेनुसार बदलही झाला. मात्र, प्रत्येक कालखंडात उत्सव उदात्तीकरणाचा जन्मदाता राहिला आहे.

कठीण काळात उत्सवांनीच मानवाला बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे. आपल्या देशात प्रत्येक ऋतू आणि हंगामात विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. आपल्या देशात विविधतेने भरलेले लोकगीतं आहेत.

शेतकरी जेव्हा पेरणी करतो तेव्हा वेगळी गाणी गातो. त्यानंतर शेतात पीकांना बहर आल्यावर वेगळे लोकगीत म्हणतो. उत्सवांशिवाय आपंल जीवन अपूर्ण आहे, तर कला आणि संगीताशिवाय आपले उत्सवच नाहीत.

संगीत किंवा योगच्या माध्यमातून आपण आपल्या आत्मशक्तीपर्यंत पोहोचतो तेव्हा तो नाद ब्रह्मनाद बनतो. त्यामुळे संगीत आणि योगमध्ये मेडिटेशन आणि मोटिवेशनची शक्ती असते. दोन्ही ऊर्जाचे अपार स्त्रोत आहेत.

हेही वाचा : पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शासन निर्णय जारी, अंमलबजावणी टप्प्याटप्पयाने होणार

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ