Navi Mumbai | नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पोलिसांची मदत घेऊन कंटेन्मेंट झोन असलेल्या विभागात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Navi Mumbai | नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या 33 विभागांना कंटेंटमेन्ट झोन (Police Bandobast At Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु कंटेन्मेंट झोन घोषित करुनसुद्धा या ठिकाणी नागरिक सर्रासपणे घराबाहेर पडून महापालिकेच्या कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे (Police Bandobast At Containment Zone).

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पोलिसांची मदत घेऊन कंटेन्मेंट झोन असलेल्या विभागात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 29 हजारांवर येऊन पोहचला आहे. नवी मुंबईतील 33 विभागांना पालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता 30 सप्टेंबरपर्यंत नवी मुंबईत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये कंट्रोल मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या भागात ये-जा करण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना थोडा त्रास होईल. पण, या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. तसेच, या भागातील दुकाने बंद राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

Police Bandobast At Containment Zone

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?

महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील आणखी 2 इमारती अतिधोकादायक

Published On - 11:10 pm, Thu, 10 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI