VIDEO : टीव्ही 9 ने नवीन वाहतूक नियम सांगितले, पोलिसानेच पळ काढला

देशात नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Rules) लागू झाल्यापासून वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. पण अनेक राज्यांनी या नव्या नियमाला (New Motor Vehicle Rules) विरोध दर्शवला आहे.

VIDEO : टीव्ही 9 ने नवीन वाहतूक नियम सांगितले, पोलिसानेच पळ काढला
सचिन पाटील

| Edited By:

Sep 10, 2019 | 9:41 PM

पटणा (बिहार) : देशात नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Rules) लागू झाल्यापासून वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. पण अनेक राज्यांनी या नव्या नियमाला (New Motor Vehicle Rules) विरोध दर्शवला आहे. नव्या नियमानुसार दंडाच्या रकमेत (Fine) मोठी वाढ केल्यामुळे नागरिकांकडून विरोध होत आहे. पण पोलिसांना याचा काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. बिहारची राजधानी पटणामध्ये आज (10 सप्टेंबर) एक पोलीस अधिकारी (Police Officer)  विना हेल्मेट दुचाकी चालवतान दिसले.

त्यानंतर टीव्ही 9 चे प्रतिनिधी रुपेश कुमार यांनी विना हेल्मेट दुचाकी का चालवत आहे, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्याला विचारला असता त्यांनी तेथून पळ काढला. पण टीव्ही 9 चे प्रतिनिधी तेथून हटले नाही. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा प्रश्न विचारला पण त्याचे उत्तर देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. टीव्ही 9 च्या कॅमेरातून सर्व घटनेचं चित्रिकरण सुरु असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने तातडीने हेल्मेट घातले आणि तेथून पळ काढला.

वाहतुकीचे नियम पोलिसांनीही पाळावे यासाठी गृह मंत्रालयातून कडक नियम पोलिसांसाठी तयार केले आहेत. जर एखादा पोलीस अधिकारी वाहतुकीचे नियम पाळत नसेल, तर त्याला निलंबीतही केले जाऊ शकते. असे असताना सुद्धा आज अनेक पोलीस वाहतुकीचे नियम मोडत असतात.

नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी विना हेल्मेट आणि सर्व सिग्नल मोडत दुचाकी चालवत होता. तेव्हाही समाजातून मोठ्या प्रमाणात पोलिसांवर टीका करण्यात आली होती.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें