AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिलिंद सोमणची नागा साधूंशी तुलना करणाऱ्या पूजा बेदीला कुंभ मेळ्याचं आमंत्रण

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणच्या नग्न फोटोंची नागा साधूंसोबत तुलना करणाऱ्या अभिनेत्री पूजा बेदीचा अखिल भारतीय अखाडा परिषदेने (एबीएपी) निषेध नोंदवला आहे.

मिलिंद सोमणची नागा साधूंशी तुलना करणाऱ्या पूजा बेदीला कुंभ मेळ्याचं आमंत्रण
| Updated on: Nov 12, 2020 | 12:23 AM
Share

अयोध्या : अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणच्या (Milind Soman) नग्न फोटोंची नागा साधूंसोबत तुलना करणाऱ्या अभिनेत्री पूजा बेदीचा (Pooja Bedi) अखिल भारतीय अखाडा परिषदेने (एबीएपी) निषेध नोंदवला आहे. एबीएपीचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी याबाबत म्हणाले की, “पूजा बेदीला नागा परंपरेबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पुढील वर्षी हरिद्वार येथे होणाऱ्या महाकुंभमध्ये येण्यासाठी आम्ही पूजा बेदीला आमंत्रित करणार आहोत. जेणेकरुन तिला नागा साधूंबाबत थोडंफार ज्ञान मिळेल”. (Pooja Bedi invited to next Kumbh Mela after comparing Milind Somans nude pic with Naga Sadhu)

काही दिवसांपूर्वी मिलिंद सोमण याने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड होऊन पळतानाचा एक फोटो काढला आणि तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. ज्यावरुन मिलिंदवर अनेकजण टीका करु लागले आहेत. याप्रकरणी मिलिंदविरोधात गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. त्याच्या फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत तक्रार नोंदवली आहे.

मिलिंदवर काहीजणांनी टीका केल्यानंतर तसेच त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर अभिनेत्री पूजा बेदी मिलिंदच्या पाठीशी उभी राहिली आहे. मिलिंदचा बचाव करण्यासाठी तिने एक ट्विट केले. त्यामध्ये तिने म्हटले होते की, “मिलिंद सोमणच्या या फोटोमध्ये कोणत्याही प्रकारची अश्लीलता नाही. अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. नग्नता एक अपराध असेल तर सर्व नागा बाबा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. केवळ शरीरावर राख रगडणे स्वीकारार्ह होणार नाही”.

याबाबत बोलताना महंत गिरी म्हणाले की, “नागा सन्यासींची एक परंपरा आहे, त्याची तुलना एखाद्या मॉडेल अथवा अभिनेत्याच्या नग्नतेशी अथवा अश्लीलतेशी करणे चुकीचे आहे. पूजाने काही वेळ कूंभ मेळ्यात घालवायला हवा. तिथे तिने नागा साधूंच्या कठीण तपश्चर्या पाहायला हव्यात”.

प्रकरण काय आहे?

मिलिंद सोमण 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेला होता. त्यावेळी मिलिंदने समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केले. तसेच स्वत:चा न्यूड फोटो त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटर पोस्ट करत फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं. त्यानंतर मिलिंदचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

मिलींदच्या या फोटोवर गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवला आहे. या पक्षाने मिलिंद सोमणविरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंचने सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Milind Soman | मिलिंद सोमण यांच्या अडचणीत वाढ; न्यूड फोटोशूटप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल

तू खरंच 55 वर्षांचा आहेस? मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही अवाक

Happy Birthday Milind Soman : ‘फिटनेस किंग’ मिलिंद सोमण 56 व्या वर्षात; तरीही फिट अँड फाईन!

‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमण, एका जाहिरातीने रातोरात आयुष्य बदलले!

(Pooja Bedi invited to next Kumbh Mela after comparing Milind Somans nude pic with Naga Sadhu)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.