अंबाजोगाईच्या चित्रकाराची किमया, रस्त्यावर चित्र रेखाटून लॉकडाऊनविषयी अनोखी जनजागृती

कोरोनाच्या काळात अंबाजोगाई येथील एका चित्रकाराने प्रशासनाच्या सहकार्याने प्रबोधनाची किमया साधली (Public Awareness about Corona Virus in Beed).

अंबाजोगाईच्या चित्रकाराची किमया, रस्त्यावर चित्र रेखाटून लॉकडाऊनविषयी अनोखी जनजागृती
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 12:21 AM

बीड : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केलं आहे. नागरिकांनाही सामाजिक अंतर ठेवण्यासाठी जागृत करुन गर्दी न करण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. परंतु नागरिकही त्याचं उल्लंघन करताना दिसतायेत. संकटाच्या या काळात अंबाजोगाई येथील एका चित्रकाराने प्रशासनाच्या सहकार्याने प्रबोधनाची किमया साधली (Public Awareness about Corona Virus in Beed). यासाठी त्याला सकाळी संचारबंदीतून अडीच तासांची सूट मिळाली. यानिमित्ताने नागरिक विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले असता त्यांना चौका-चौकात रस्त्यांवर काढलेली प्रबोधनात्मक आकर्षक चित्रे रेखाटलेली दिसून आली. त्या चित्रांद्वारे कोरोनाची गंभीरता आणि लॉकडाऊनचे महत्व नागरिकांच्या सहज लक्षात येण्यास मदत झाली. योगेश कडबाने असं या चित्रकाराचं नाव आहे.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशासह बीड जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचार बंदी आणि जमाव बंदी लागू करण्यात आली. नागरिकांना घरातच थांबून सामाजिक अंतर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. परंतु प्रशासनाच्या आवाहनाला नागरिक दाद देत नसल्याचं वारंवार समोर येत आहे.

कोरोनाविषयी अद्यापही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे लोक रस्त्यावर येतच आहेत. त्यामुळे अंबाजोगाईतील चित्रकार योगेश कडबाने आणि त्यांचे सहकारी पुढे आले आहेत. हे पाचही चित्रकारांनी शहरातील चौका-चौकातील रस्त्यावर कोरोना विषाणूची गंभीरता दाखवणारी चित्र रेखाटली. त्यातून त्यांनी नागरिकांना कोरोना संसर्गातून होणारा मृत्यूचा धोका टाळण्याचं आवाहन केलं. तसेच हा लॉकडाऊन का? आणि कशासाठी केला हेही रस्त्यांवर रेखाटलेल्या चित्रातून दाखवलं. घरातच राहा, सुरक्षित राहा असा संदेशही त्यांनी आपल्या चित्रांमधून दिला.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून प्रशासनाच्यावतीने संचार बंदी शिथिल करण्यात येते. मात्र यावेळी नागरिक सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून गर्दी करतात. यामुळे कोरोनाच्या साखळी तोडण्याच्या आणि बंद करण्यामागची शासन- प्रशासनाच्या या मुख्य उद्देशाची फसगत होत आहे. ही बाब अंबाजोगाई येथील चित्रकार योगेश कडबाने यांच्या लक्षात आली. त्यामुळं लॉकडाऊन विषयी लोकांचे प्रबोधन करावे अशी कल्पना त्यांना सुचली.

कडबाने आपल्या मनातील कल्पनेविषयी आमदार नमिता मुंदडा यांना सांगितलं. आमदार मुंदडा यांनीही याला प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी चित्रकार कडबाने यांना रंगासह सर्व साहित्य उपलब्ध करुन देत प्रोत्साहित केलं. शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षक सिद्धार्थ गाडे यांनीही यासाठी परवानगी दिली.

प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यावर योगेश कडबाने आणि त्यांचे सहकार राहुल भिसे, मनोज कोकणे, बालाजी चौरे व रंगनाथ गाडेकर यांनी अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, यशवंतराव चव्हाण चौक अन्य एकूण 7 चौकांमध्ये चित्रे रेखाटली.

यात ‘लॉकडाऊनचे नियम पाळा, यम टाळा’, कोरोना म्हणजे कोई रोड पर ना निकले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या गर्भाशया एवढेच आपले घर सुरक्षित आहे” “त्यामुळे घरातच थांबा” असे विविध संदेश यातून देण्यात आले. संदेश प्रभावी करण्यासाठी यमाच्या रुपात रेड्यावर बसू येणारा कोरोना विषाणू कल्पकतेने रेखाटण्यात आले. पोलिसांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ‘वर्दीतला देव तुमच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे’ असा संदेशही एका चित्रातून देण्यात आला आहे.

चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष या प्रबोधनात्मक चित्रांनी वेधून घेतले. दरम्यान चित्रकार कडबाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिक कौतुक करत आहेत. योगेश कडबाने यांनी या कौतुकावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, की आमचं कौतूक करु नका, पण चित्रातून दिलेला संदेश अवश्य पाळा. लवकरच शहरातील अन्य प्रमुख चौकातही चित्रांद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Public Awareness about Corona Virus in Beed

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.