पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार, अटी काय?

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार (Pune Corona Patient Treatment at home) आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार, अटी काय?

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली. (Pune Corona Patient Treatment at home)

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलग करुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था उभारली जाणार आहे. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर फोनवरुन सल्ला देणार आहे.

कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचे घर मोठे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र किचन, बेडरुम, बाथरुम आणि केअर टेकर आहेत, या रुग्णांवरच घरी उपचार करण्यात येतील, अशा अटी पालिकेने ठेवल्या आहेत.

मात्र झोपडपट्ट्या किंवा वस्त्यांवरील रुग्णांना हॉस्पिटलमध्येच उपचार दिले जाणार आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा उपाय सुचवला आहे, असे पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा – Pune Corona | पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या पार

पुणे जिल्ह्यात काल  (10 जून) दिवसभरात 435 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 394 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 449 जण कोरोनाबळी गेले आहेत.

तर दुसरीकडे  पुण्यात दिवसभरात 304 नवीन बाधित रुग्णांचा वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील बाधितांचा आकडा 8 हजार 509 वर पोहोचला आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ही 406 वर पोहोचली आहे. (Pune Corona Patient Treatment at home)

संबंधित बातम्या : 

पुण्यात खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु, एकावेळी 6 प्रवासी, ताशी 85 हजार दर

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

Published On - 8:34 am, Thu, 11 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI