Pune Corona Recovery | सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पुणे विभागाचा रुग्ण बरे होण्याचा दर 62.15 टक्क्यांवर

पुणे विभागात 9 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. सध्या विभागात 14 हजार 650 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Pune Corona Recovery | सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पुणे विभागाचा रुग्ण बरे होण्याचा दर 62.15 टक्क्यांवर

पुणे : पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या (Pune Corona Recovery Rate) रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विभागात 9 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. सध्या विभागात 14 हजार 650 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 हजार 887 अॅक्टिव्ह रुग्ण असून 658 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 271 रुग्ण गंभीर असून वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विभागात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62. 15 टक्के असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Pune Corona Recovery Rate) यांनी सांगितलं.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण?

विभागात सर्वाधिक जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात सध्या 11 हजार 397 बाधित रुग्ण असून 7 हजार 110 रुग्ण बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 811 असून 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 263 रुग्ण गंभीर आहेत. जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.

साताऱ्याता कोरोनाचे 718 रुग्ण

सातारा जिल्ह्यात 718 कोरोनाबाधित रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 215 असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Pune Corona Recovery Rate).

सोलापुरात 1,612 कोरोना रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 612 कोरोनाबाधित रुग्ण असून 814 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 661 असून 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगलीत 213 रुग्ण 

सांगली जिल्ह्यात 213 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी 106 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण 101 असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात कोरोनाचे 710 रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात 710 कोरोनाबाधित रुग्ण असून 603 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण 99 असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune Corona Recovery Rate

संबंधित बातम्या :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंपवर आत्मनिर्भर उपक्रम

पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त

लाॅकडाऊनमध्ये परीक्षा घेणाऱ्या तळेगावातील महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाई

Pune Death Rate | पुण्याचा मृत्यूदर घसरला, मात्र तरीही राज्य आणि देशापेक्षा जास्तच

Published On - 11:22 pm, Sat, 13 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI