पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन, ड्रायव्हरला कोरोना

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली (Pune Deepak Mhaisekar Driver Corona Positive) आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन, ड्रायव्हरला कोरोना

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दीपक म्हैसेकर स्वत: होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar Driver Corona Positive)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दीपक म्हैसेकर यांनी खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. दीपक म्हैसेकर हे कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसांपासूनच फिल्डवर काम करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला दीपक म्हैसेकर यांनी कोरोनापासून कशी काळजी घ्यायची, कोरोना रुग्णांची संख्या याबाबतची माहिती सातत्याने पत्रकार परिषदेतून देत होते.

पुण्यात विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात कोरोना रोखण्याबाबत रणनिती आखली जात आहे. कोरोना नियंत्रणाच्या सर्व बैठका दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. कालही म्हैसेकरांनी पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत हजेरी लावली होती. या बैठकीला व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तसह डझनभर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सर्व अधिकाऱ्यांचे वाहनचालक एकमेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 13 जुलै मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे. दरम्यान, या लॉकडाऊन काळात सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी (Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar Driver Corona Positive) दिली.

संबंधित बातम्या : 

Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये लॉकडाऊन; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

Published On - 6:31 pm, Tue, 14 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI