Corona : पुण्याच्या दोन बहिणींच्या कुटुंबातील 6 जणांची ‘कोरोना’वर मात

या बहिणींच्या कुटुंबातील 6 सदस्य हे कोरोनाबाधित होते. मात्र, आता या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Corona : पुण्याच्या दोन बहिणींच्या कुटुंबातील 6 जणांची 'कोरोना'वर मात

पुणे : कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूची लागण झाल्याने (Pune Family Beat Corona) कोणीही घाबरुन जाईल. मात्र, पुण्याच्या दोन बहिणी आणि त्यांच्या कुटुंबांनी मात केली आहे. या बहिणींच्या कुटुंबातील 6 सदस्य हे कोरोनाबाधित होते. मात्र, आता या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते सर्व आता निरोगी आहेत. अशी माहिती दैनिक भास्करच्या वृत्तात देण्यात (Pune Family Beat Corona) आली आहे.

41 वर्षीय एका महिलेला (Pune Family Beat Corona) गेल्या 14 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5-6 दिवस खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने या अंगणवाडी कार्यकर्ता महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या महिलेची मोठी बहीण ही याच रुग्णलयात परिचारीका म्हणून काम करते. तिने तिच्या लहान बहिणीची काळजी घेतली. तोपर्यंत या महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालेलं नव्हतं. चार दिवसांनंतर तिचा रिपोर्ट आला, त्यामध्ये ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर या महिलेचा पती, मुलगा, बहीण, बहिणीचा पती आणि मुलगी या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

हेही वाचा : पुण्यात ‘कोरोना’ग्रस्त महिलेच्या पार्थिवावर महापालिकेकडून तीन दिवसांनी अंत्यसंस्कार

एक बहीण व्हेंटिलेटरवर, दुसरीने संपूर्ण कुटुंब साभाळलं

जेव्हा लहान बहीण व्हेंटिलटरवर होती, तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त होतं. मात्र, मोठ्या बहिणीने न खचता कुटुंबाला आधार दिला. त्यांनी स्वत:सोबतच संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली.

जेव्हा सुरुवातीला त्यांना माहित झालं की त्यांच्या लहान बहिणीसोबत संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे, तेव्हा त्या घाबरल्या. मात्र, नंतर त्यांनी याला लढा देण्याचा निश्चय केला. डॉक्टरांनीही या कुटुंबाचं धैर्य वाढवलं आणि ते कोरोनाला हरवण्यात यशस्वी झाले.

12 दिवसांनंतर जेव्हा व्हेंटिलेटर काढलं

लहान बहिणीची तब्येत जास्त खराब होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अशा वेळी मोठ्या बहिणीला आणि त्यांच्या संपू्र्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याने, त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या लहान बहिणीला भेटायला कुणीही जाऊ शकत नव्हतं.

मात्र, लहान बहीण व्हेंटिलेटरवर असल्याने तिच्यापासून हे लपवायचं होतं. त्यामुळे कुठला ना कुठला बहाणा करुन तिच्यापासून ही गोष्ट लपवण्यात आली. यादरम्यान, तिचे कुटुंबिय व्हिडीओ कॉलवरुन तिच्याशी बोलत राहायचे. त्यांना हेही लपवावं लागलं की ते देखील त्याच रुग्णालयात क्वारंचाईन वॉर्डमध्ये आहेत.

12 दिवसांनंतर जेव्हा लहान बहिणीला व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं तेव्हा तिला माहित झालं की तिचं आणि तिच्या बहिणीचं कुटुंब त्याच रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये आहे.

एकाच कुटुंबातील सहा जणांना या कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं होतं. मात्र, त्यांनी हिम्मत हारली नाही आणि कोरोनावर मात केली. या दोन बहिणींची कहाणी कोरोनाशी लढणाऱ्या त्या अनेक रुग्णांसाठी एख आशेची किरण (Pune Family Beat Corona) ठरु शकते.

Published On - 9:31 am, Wed, 8 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI