Pune Lockdown | पुण्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी निर्बंध : जिल्हाधिकारी

23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही. मात्र, गर्दी टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

Pune Lockdown | पुण्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी निर्बंध : जिल्हाधिकारी
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 12:57 AM

पुणे : दहा दिवसाच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु झाला (Pune Lockdown Update). या टप्प्यात काहीशी शिथिलता आणण्यात आली. 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही. मात्र, गर्दी टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. आठवड्याच्या वीकेंडला शनिवारी-रविवारी, लग्न आणि मार्केटला गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं (Pune Lockdown Update).

23 जुलैनंतर काही प्रमाणात निर्बंध असतील. मात्र, नागरिकांना त्रास होणार नसल्याची दक्षता घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. जुलै महिन्यात रुग्ण वाढल्याने कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, नागरिकांना लॉकडाऊन मान्य नसेल, तर जनतेच्या इच्छेविरुद्ध काहीही करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्रकारांशी संवाद साधत होते. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि पालिका अतिरिक्त आयुक्त शंतनु कुमार गोयल यांनी संवाद साधला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुण्यात रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर

यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सध्या 17 हजार 54 अॅक्टिव रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.6 टक्के असून एक टक्‍क्‍यापेक्षा मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितलं. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मृत्यू दर 1.6 टक्के आहे. टेस्टिंग वाढल्याने आणि त्वरित निदान झाल्याने मृत्यू दरात घट झाली. मात्र, सरासरी रोज 25 मृत्यू होत असून हे चिंताजनक आहे. मृत्यूदर कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

जिल्ह्यात सध्या सामाजिक प्रसार सुरु आहे, की नाही याबाबत सांगू शकत नाही. आमचं प्रशासनाचं काम आहे. मात्र, सामाजिक प्रसार आहे, असं समजूनच आमचे प्रयत्न सुरु असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं (Pune Lockdown Update).

पुण्यात व्हेंटिलेटर 68 बेड उपलब्ध : जिल्हाधिकारी 

रुग्णालयातील बेड संदर्भात बोलताना ससून रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णालयात नवीन बेड उपलब्ध होणार आहेत. सध्या व्हेंटिलेटर 68 बेड उपलब्ध आहेत. तर बेडची कमतरता जाणवणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर काही हॉस्पिटल 100% कोव्हिड आणि नॉन कोव्हिड जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तर ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय कर्मचारीसुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत. या महिन्याच्या अखेर बेडवर पूर्ण नियंत्रण राहील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर तीन दिवसात तीस हजारपेक्षा टेस्ट केले आहेत. लॉकडाऊन काळात जास्तीत जास्त तपासणी केलेली आहे. त्यामुळे रुग्ण वाढले असून काहीजण पॅनिक होत आहेत. मात्र, काळजी करु नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

कोरोना संदर्भात कंपनी दुर्लक्ष करुन माहिती दडवून ठेवले आणि कामगारांना कामावर घेण्याचा आग्रह धरल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय औषध मुबलक प्रमाणात असून रेमडिसीवर कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

पालिका अतिरिक्त आयुक्त शांतनु कुमार गोयल यांनी पुणे शहरातील कोरोनाचा आढावा सांगितला. लॉकडाऊन काळात ट्रेसिंग आणि टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवलं. त्याचबरोबर तीन मोठे कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सेंटर कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितलं.

विभागातील सर्वच जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर इथ वेगवेगळ्या तारखेला लॉक डाऊन जाहीर केलाय. तर सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर होणार आहे. मात्र सोलापूर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. सोलापूर मध्ये लवकर निदान, व्याधी असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांना प्राधान्य देणे, यासह वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात बाहेरील वैद्यकी टीम सुद्धा कार्यरत असल्याचं विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

Pune Lockdown Update

संबंधित बातम्या :

Pune Lockdown: 120 दिवस खूप सहन केलं, आता क्षमता संपली, लॉकडाऊनवाढीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

होम क्वारंटाईनमधील कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईत, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.