होम क्वारंटाईनमधील कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईत, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

पिंपरी चिंचवडमध्ये होम क्वारंटाईनमध्ये असलेली (Pimpri Chinchwad Corona Positive Women Ran away at Dubai) कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईला पोहोचली आहे.

होम क्वारंटाईनमधील कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईत, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 11:18 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये होम क्वारंटाईनमध्ये असलेली (Pimpri Chinchwad Corona Positive Women Ran away at Dubai) कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईला पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सोसायटीने पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा दावा सोसायटीकडून करण्यात येत आहे. यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 11 जुलैला या महिलेने पिंपरी-चिंचवडमध्ये आदित्य बिर्ला रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी 12 जुलैला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिला कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे तिने गृह विलगीकरणात राहण्याची विनंती केली होती. त्यामुळे तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मात्र 17 जुलैच्या रात्री मेडिकलमध्ये जाते हे सांगून ती सोसायटीच्या बाहेर पडली. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती परत आलीच नाही. त्यानंतर तिने थेट दुबईला पळ काढला. विशेष म्हणजे दुबईला पोहोचल्यानंतर संबंधित महिलेने शारजाह विमानतळावरुन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा मॅसेज सोसायटी सदस्यांना पाठवला.

यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार दिली. मात्र त्याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा सोसायटीने केला आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आज (20 जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये 987 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 11 हजार 494 वर पोहोचला आहे. तर आज पिंपरी चिंचवडमध्ये 11 कोरोनाबळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ही 209 वर पोहोचली (Pimpri Chinchwad Corona Positive Women Ran away at Dubai) आहे.

संबंधित बातम्या : 

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात

Pune Lockdown: 120 दिवस खूप सहन केलं, आता क्षमता संपली, लॉकडाऊनवाढीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.