पुण्यात प्रवीण गायकवाडांना विरोध, काँग्रेसची डोकेदुखी वाढली

मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीवरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण पुण्यात लोकसभा उमेदवारावरुन काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आयात उमेदवाराला विरोध केला आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र या चर्चेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील […]

पुण्यात प्रवीण गायकवाडांना विरोध, काँग्रेसची डोकेदुखी वाढली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीवरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण पुण्यात लोकसभा उमेदवारावरुन काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आयात उमेदवाराला विरोध केला आहे.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र या चर्चेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आयात उमेदवार दिला जाऊ नये अशी एकमुखी मागणी, काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्त्यांनी केली.   यापूर्वी बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, अनंत गाडगीळ यांनी आयात उमेदवारी देण्यावर नाराजी व्यक्त केली होती.

पुण्याच्या काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे आयात उमेदवारीविरोधात तक्रारी केल्या होत्या. आता कालच्या पुण्याच्या बैठकीत उघड विरोध झाल्याचं दिसून आलं.

वाचा: लोकसभा निवडणुकीबाबत सेहवागची मोठी घोषणा

एकीकडे राज्यात युती, आघाडी होत असली तरी दुसरीकडे मात्र पुण्याच्या जागेचा तिढा अजून काही सुटेना. पुण्यात काँग्रेसने निष्ठवंताना बाजूला सारल्यामुळे पक्षाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांना बैठक घेऊन पक्षातील वाद सोडवावा लागला. आयात उमेदवार लादू नका हेच म्हणणं या बैठकीत मांडण्यात आले.

राहुल गांधींकडून प्रवीण गायकवाडांच्या नावाला हिरवा कंदील?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने या जागेसाठी उमेदवार आयात केल्याची चर्चा आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील, असं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे नाव सुचवलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे.

जातीय समीकरणे लक्षात घेत काँग्रेसने प्रवीण गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात होतं. प्रवीण गायकवाड यांच्या जनसंपर्काचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज लावला जात आहे. शिवाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे वातावरण तापलं होतं, त्याचाही राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फायदा घेतला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या 

पुण्यात राहुल गांधींनी सुचवलेल्या उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध?   

पुणे लोकसभा: भाजपकडून जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ चर्चेत  

संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?  

पुणे लोकसभा : आघाडीची तयारी, भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र  

लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!  

Non Stop LIVE Update
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.