पदपथावर गणेश मूर्तीचे स्टॉल नको, पुणे महापौरांचा कारवाईचा इशारा

पदपथावर गणेश मूर्तीचे स्टॉल नको, पुणे महापौरांचा कारवाईचा इशारा

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण साधेपणाने साजरे केले जात आहेत (Pune Mayor action on Ganapati stall).

सचिन पाटील

| Edited By:

Aug 13, 2020 | 8:40 AM

पुणे : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण साधेपणाने साजरे केले जात आहेत (Pune Mayor action on Ganapati stall). काही दिवसांवर असलेला गणेशोत्सव सणही यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यादरम्यान पदपथांवर अथवा रस्त्यांच्या कडेला गणेश मूर्तीच्या विक्री करीता उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत (Pune Mayor action on Ganapati stall).

या सर्व गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना परिसरातील महापालिकेच्या शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही मोहोळ यांनी सूचित केले.

गणेशोत्सवात गणेश मूर्ती खरेदी करण्याकरीता नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिगचे पालन करावे या उद्देशाने रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच उपनगरातील सर्व पदपथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश मूर्ती विक्रेत्या स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

या सर्व स्टॉलधारकांना महापालिकेतील वर्ग खोल्या एका आड एक मोफत उपलब्ध करून दिल्या जातील. याकरीता कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही. मात्र, जोपर्यंत स्टॉल असेल तोपर्यंत अनामत रक्कम म्हणून पाच हजार रूपये घेण्यात येणार आहे.

दुसरीकडे प्रत्येक गणेश मूर्ती विक्रेत्यास प्रत्येक गणेश मूर्तीसह एक किलो अमोनियम बायोकार्बोरेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रसायनाचा पुरवठा महापालिकेकडून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

याचबरोबर नागरिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे याकरीता, पालिकेच्या आरोग्य कोठींसह मोठ्या सोसायट्यांमध्ये ही पालिकेच्यावतीने अमोनियम बायोकार्बोरेट हे रसायन पुरविले जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

‘महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार’, पुण्यात मनसे आक्रमक

Pune | पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदारांची बदली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें