AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदारांची बदली

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोण बसणार याचा फैसला मात्र अद्याप झालेला दिसत नाही.

Pune | पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदारांची बदली
फोटो सौजन्य : divcommpune.in
| Updated on: Aug 12, 2020 | 8:23 AM
Share

पुणे : पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी आणि पाच तहसीलदारांची बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोण बसणार याचा फैसला मात्र अद्याप झालेला दिसत नाही. (Pune Division Deputy Collector and Tehsildar Transfer)

पुणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. तर भुदरगडचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांची बदली सोलापूर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे यांची सातारा येथे पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तर सोलापूरच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची नलावडे यांच्या जागी म्हणजे कोरेगावच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे विभागातील पाच तहसीलदारांची बदली

पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार विवेक साळुंके यांची बदली सोलापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीची राजेश देशमुखांना, काँग्रेसची योगेश म्हसेंना पसंती, शिवसेनेकडून दोन नावं, पुणे जिल्हाधिकारीपदी कोण?

साताऱ्यातील पुनर्वसन तहसीलदार शुभांगी फुले यांची पुणे येथे सर्वसाधारण शाखेत बदली झाली आहे. तर उपप्रबंधक एमआरटी तहसीलदार दिगंबर रौंदळ यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे.

पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार सुरेखा दिवटे यांची विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन कार्यालयात बदली झाली आहे. तर आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांची सोलापूर येथे सर्वसाधारण शाखेत बदली करण्यात आली आहे. (Pune Division Deputy Collector and Tehsildar Transfer)

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोण?

कोरोना संकटाच्या काळातही पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावर कुणाची नियुक्ती होणार यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांमध्ये देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेसकडून डॉ. योगेश म्हसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश देशमुख, तर शिवसेनेकडून जी श्रीकांत, अस्तिक कुमार पांडे यांची नाव पुढं येण्याची शक्यता आहे. कुणाल खेमनार यांची नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचंही नाव नव्यानं चर्चेत आलं आहे.

(Pune Division Deputy Collector and Tehsildar Transfer)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.