राष्ट्रवादीची राजेश देशमुखांना, काँग्रेसची योगेश म्हसेंना पसंती, शिवसेनेकडून दोन नावं, पुणे जिल्हाधिकारीपदी कोण?

कोरोना संकटाच्या काळातही पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर कुणाची नियुक्ती होणार यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे (Appointment of Pune collector).

राष्ट्रवादीची राजेश देशमुखांना, काँग्रेसची योगेश म्हसेंना पसंती, शिवसेनेकडून दोन नावं, पुणे जिल्हाधिकारीपदी कोण?

पुणे : कोरोना संकटाच्या काळातही पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर कुणाची नियुक्ती होणार यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे (Appointment of Pune collector). पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांमध्ये देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातूनच पुणे जिल्हाधिकारी पदावरील नियुक्तीचा प्रश्न भिजत पडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात आधीच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यातच प्रशासनाचा प्रमुख असणारं जिल्हाधिकारी पदही रिक्त असल्याने याचा परिणाम उपाययोजनांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष सुरु आहे. तिन्ही राजकीय पक्षांना पुणे जिल्हाधिकारी म्हणून आपल्या मर्जीतील अधिकारी हवा आहे. यासाठी तिन्ही राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चा आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर कुणाची नियुक्ती करायची यावर अद्याप तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. त्यामुळेच पुणे जिल्हाधिकारी नियुक्ती रखडली आहे. कोरोनाग्रस्त पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा घोळ अद्याप न मिटल्याने कोरोना नियंत्रणाचं काम प्रभावी कसं होणार असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत. राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांच्याही नुकत्याच बदली झाल्या. अशा परिस्थितीत पुण्याचा निर्णय मात्र राजकीय इर्षेतून रखडल्याचा आरोप होत आहे.

सध्या पुणे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे देण्यात आला आहे. सोमवारपासून (10 ऑगस्ट) आयुष प्रसाद यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचा प्रभार असेल. पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेसकडून डॉ. योगेश म्हसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश देशमुख, तर शिवसेनेकडून जी श्रीकांत, अस्तिक कुमार पांडे यांची नाव पुढं येण्याची शक्यता आहे. कुणाल खेमनार यांची नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचंही नाव नव्यानं चर्चेत आलंय.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यानं पालकमंत्री अजित पवार यांचाच जिल्हाधिकारी पदाच्या निवडणुकीत वरचष्मा राहणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीकडून राजेश देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे.

संबंधित बातमी 

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार फिल्डिंग, मंत्र्यांकडे लॉबिंग, चार नावं चर्चेत

Appointment of Pune collector

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *