पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

नवी दिल्ली : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमओमध्ये उपसचिवपदी नवल किशोर राम यांची वर्णी लागली आहे. (Pune Collector Naval Kishore Ram appointed as Deputy Secretary in PMO)

चार वर्षांसाठी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत.

नवल किशोर राम यांचा समावेश दोन महिन्यांपूर्वीच देशातील 50 सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत करण्यात आला होता. ‘फेम इंडिया’ आणि एशिया पोस्ट सर्व्हे’ या खासगी संस्थांनी हे सर्वेक्षण केले होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

पुण्यात गेल्या वर्षी आलेला महापूर असो किंवा सध्या कोरोनाचे संकट असो, जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्याचे बोलले जाते.

सौरभ राव यांच्या जागी एप्रिल 2018 मध्ये नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली होती. याआधी त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ, बीड, औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

(Pune Collector Naval Kishore Ram appointed as Deputy Secretary in PMO)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *