पुणे पोलिसांचं मिशन ‘ऑल आऊट’, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या ‘मच्छरां’वर कारवाई

पुणे पोलिसांचं मिशन 'ऑल आऊट', मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या 'मच्छरां'वर कारवाई

पुणे पोलिसांनी मिशन 'ऑल आऊट' (Pune Police mission all out) हाती घेतलं आहे. मॉर्निंक वॉकच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिक्षा देऊन घरी पिटाळण्याचं काम पोलीस करत आहेत.

सचिन पाटील

|

Apr 17, 2020 | 12:30 PM

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस (Pune Police mission all out) वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र मॉर्निंग वॉक करणाऱ्या पुणेकरांच्या डोक्यात ही बाब शिरत नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच पुणे पोलिसांनी मिशन ‘ऑल आऊट’ (Pune Police mission all out) हाती घेतलं आहे. मॉर्निंक वॉकच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिक्षा देऊन घरी पिटाळण्याचं काम पोलीस करत आहेत.

पुण्यात लॉक डाऊन तोडून मोकाट फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई सुरुच आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात 60 ते 80 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. मॉर्निंग वॉक आणि भाजीपाला आणण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचा यामध्ये समावेश होता.

यावेळी पुरुषांशिवाय अनेक महिलाही फिरताना आढळून आल्या. या सर्व नागरिकांना स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात शारीरिक कसरती करायला लावल्या. जोर-बैठका, अंगठे धरायला लावणे अशा शिक्षा पोलिसांनी दिल्या. तर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना तोंडाला शर्ट बांधायला लावला.

काल गुरुवारीही शहरात तेराशे वाहने जप्त करुन पाचशे नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र मोकाट फिरणाऱ्यांचं प्रमाण कमी होत नसल्याने पोलीसही त्रस्त झालेत.

येरवडा परिसरातही कारवाई

दरम्यान, संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 6 ते 7:30 च्या दरम्यान एकूण 70 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मॉर्निंग वॉक करणे, कुत्र्याला बाहेर फिरवणे अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. येरवडा,कल्याणी नगर या परिसरातील हे सर्व नागरिक आहेत. नागरिक सूचनांचे पालन करत नसल्यामुळे कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें