पुण्यात मोकाट फिरणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल, नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Pune Police use drone) आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना चोप देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला.

पुण्यात मोकाट फिरणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल, नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर

पुणे : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली (Pune Police use drone) आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 193 झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. तर पुण्यात 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही अनेक जण या आदेशाला हरताळ फासताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल 300 मोकाट फिरणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Pune Police use drone) आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना चोप देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र तरीही काहींनी यावर कानाडोळा केल्याने पुणे पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत तब्बल 300 जणांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असूनही हा आकडा वाढणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी ही माहिती दिली आहे.

यामुळे 188 कलमानुसार कारावास आणि दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेल्यांना नोकरीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच मोकाट फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीस उद्यापासून ड्रोनचा वापर करणार आहे. सध्याच्या शहरातील चौकातील ठिकाणच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून मोकाट फिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. त्यांच्यावरही या माध्यमातून कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे या ड्रोनला स्पीकर लावण्यात आलेले आहे. त्या माध्यामातून सूचनाही दिल्या जाणार (Pune Police use drone) आहेत.

संबंधित बातम्या : 

कोरोनाचा बारामतीत प्रवेश, न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ दरम्यान मृत्यू झालेल्या ‘त्या’ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, राज्यात कोरोना बळींची संख्या 8 वर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI