पुण्यात रेशन दुकानातून धान्य वितरण सुरु, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियमावली

या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणं सर्व दुकानदारांना बंधनकारक (Pune Ration Store Regulation for avoid rush) असणार आहे.

पुण्यात रेशन दुकानातून धान्य वितरण सुरु, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियमावली
आता पासपोर्ट-पॅन कार्ड मिळवण्यासाठी भटकंती संपली!

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Ration Store Regulation for avoid rush) आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारमार्फत अनेक गरीबांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रेशन दुकानातून केशरी कार्डधारकांना धान्य देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी धान्य वितरणासाठी दुकानदारांना नियमावली घालून दिली आहे.

या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणं सर्व दुकानदारांना बंधनकारक (Pune Ration Store Regulation for avoid rush) असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे आणि नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जाऊ शकतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानात सवलतीच्या दरात धान्य वितरीत करण्यात येते. त्यावेळी विनाकारण दुकानात गर्दी होऊ नये, संसर्ग दूर ठेवता यावा यासाठी पोलिसांकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्नधान्य वितरण कार्यालयाकडूनही एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच नागरिकांना धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

काय आहे पोलिसांची नियमावली

  • सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी राहिल.
  • टोकन मिळविण्यासाठी नागरिक सकाळी 8 पूर्वी गर्दी करू शकतात़.
  • त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त असणार आहे.
  • नागरिकांनी उभे राहताना सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहावे.
  • त्यासाठी दुकानदारांनी रांगेचे योग्य मार्किंग करावे लागणार आहे.
  • आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सोय करणे दुकानदारांना बंधनकारक
  • सर्व शिधापत्रिकाधारकांना टोकन वितरित करुन पहिल्या 100 शिधापत्रिका धारकांना प्रथम धान्य वितरण करण्यात येईल़.
  • उर्वरित शिधापत्रिका धारकांना वेळापत्रकांप्रमाणे पुढील तारखेचे टोकन देण्यात येईल़
  • प्रत्येक तासाला 15 टोकनधारक याप्रमाणे दिवसाला किमान 100 जणांना धान्य वितरण करण्यात येईल़

पुणे शहरात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य वाटप दुकानात जाण्याच्या निमित्ताने इतरांकडून आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या दुकानात जाणाऱ्या व्यक्तीकडे अधिकृत टोकन असल्याची खात्री करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून सुचित केलेल्या या खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील.

पुणे शहरात 4 लाख 60 हजार केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. तर 500 शिधा वाटप दुकाने आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवसात रेशन दुकानातून प्रत्येकी जवळपास 1 हजार शिधापत्रिकाधारक धान्य खरेदीसाठी दुकानात येऊ शकतात. त्यानुसार, हे सर्व नियोजन करण्यात आले (Pune Ration Store Regulation for avoid rush) आहे़.

संबंधित बातम्या : 

पुण्यातील विळखा आणखी घट्ट, 90 नव्या कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा हजार पार

लॉकडाऊनदरम्यान तब्बल 69 हजार गुन्हे दाखल, 100 नंबरवर 77 हजार कॉल, दोन कोटीपेक्षा अधिक दंड

Published On - 10:21 am, Sun, 26 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI