पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रतिबंधित भागात आता अधिक कडक बंधने (Pune Strict restrictions in hotspots) लागू करण्यात येणार आहे.

पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 1:38 PM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रतिबंधित भागात आता अधिक कडक बंधने (Pune Strict restrictions in hotspots) लागू करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना घराबाहेरच पडू दिलं जाणार नाही. लॉकडाऊन 4 मध्येही ही बंधने कायम राहणार आहेत. यासंदर्भात पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे कडक नियोजन सुरु आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी जीवनाश्यक साहित्य घरात आणून ठेवावे लागणार आहे. (Pune Strict restrictions in hotspots)

वाचा : पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह 

सध्या गल्लीबोळात पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे. प्रतिबंधित भागात भाजीपाला आणि अन्य विक्रेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पुण्यातील रुग्णसंख्या वाढतीच

पुणे जिल्ह्यामध्ये 12 तासात 62 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 3629 बाधित रुग्ण तर 186 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीपर्यंत 21 कोरोना तर मध्यरात्रीनंतर 41 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एका रात्रीत तब्बल 62 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं.

दुसरीकडे पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात 141 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काल 3567 वर पोहोचला होता. त्यामध्ये मध्यरात्री वाढ होऊन आकडा 3600 च्या वर गेला.

Pune Strict restrictions in hotspots

संबंधित बातम्या 

Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ 

पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्ससाठी तीन तास ताटकळत, खुर्चीवर बसून वाट पाहणाऱ्या रुग्णाने बायको-मुलासमोर प्राण सोडले 

Non Stop LIVE Update
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.