पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह

पुण्यात कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केलेल्या तरुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला (Pune Corona Suspected Patient Suicide) आहे.

पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 9:01 AM

पुणे : पुण्यात कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला (Pune Corona Suspected Patient Suicide) आहे. कोरोनाच्या भीतीने संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता (Pune Corona Suspected Patient Suicide) होती.

कोरोना संशयित रुग्णाने गुरुवारी (14 मे) रात्री वीज गेल्याची संधी साधत रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. या 24 वर्षीय तरुणाला सर्दी, खोकला आणि ताप होता. त्यामुळे या तरुणाला कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच तरुणाचा कोरोना तपासणीचा अहवाल शुक्रवारी (15 मे) येणार होता. मात्र कोरोनाची भीती सतावत असल्याने बेचैन असलेल्या तरुणानं आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय घेतला.

तरुणाने तपासणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करायला हवी होती, असं मत डॉक्टर आणि नातेवाईकांनी व्यक्त केले.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात आत्महत्ये केलेल्या तरुणाला सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे कोरोना संशयित रुग्ण म्हणून बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले होते. दुपारी तपासणीसाठी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यानंतरही तो तणावग्रस्त होता. रात्री नऊ वाजताच्या सुमारास तरुणाने स्वच्छतागृहात जाण्याचे कारण सांगितले आणि तो खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन त्याने आत्महत्या केली.

याआधी अकोल्यातही कोरोनाग्रस्त रुग्णाने गळ्यावर ब्लेडने वार करुन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.

‘कोरोना’ बरा होतो!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ ‘कोरोना’ बरा होत असल्याची शाश्वती देतात. महाराष्ट्रात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यातच नवे रुग्ण सापडण्याच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्वदी पार केलेल्या किंवा कर्करोगासारख्या व्याधी जडलेल्या रुग्णांनीही कोरोनाला ‘टफ फाईट’ देऊन विजय मिळवला आहे.

‘कोरोना’ झाला म्हणजे सगळं संपलं, हा गैरसमज असल्याचं उद्धव ठाकरे अनेक वेळा आपल्या संबोधनात सांगतात. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने किंवा कोरोना झाल्यासही रुग्णांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, असे पुन्हा एकदा आवाहन केले जात आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या, रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.