मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणायला, पुण्यातील धक्कादायक चित्र, लॉकडाऊनमध्येही गांजा विक्री

पुण्यात तर एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली. महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा (Pune youth arrested for carrying Ganja drug) आणण्यासाठी गेला होता.

मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणायला, पुण्यातील धक्कादायक चित्र, लॉकडाऊनमध्येही गांजा विक्री

पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. देशात 14 एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन महाराष्ट्र सरकारने 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे (Pune youth arrested for carrying Ganja drug). या लॉकडाऊनमुळे अनेकजण आपली गैरसोय होत असल्याची तक्रार करत आहेत. यामध्ये अनेक बेवडे आणि व्यसनी लोकांचं प्रमाण अधिक आहे. पुण्यात तर एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली. महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ‘चरसी’चं बिंग फुटलं. (Pune youth arrested for carrying Ganja drug) पुणे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

ऋषी रवींद्र मोरे आणि सागर चंद्रकांत सुर्वे असं या तरुणांची नावं आहेत.  दोघांकडून एकवीसशे रुपयाचा गांजा जप्त केला. दोघेही 20 ते 21 वर्षीय वयोगटाचे असून पर्वती परिसरातील रहिवासी आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे ड्रेस घालून ते गांजा वितरण करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे चौकशीत मोठ्या या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गांजासाठी या तरुणांनी ही अनोखी शक्कल लढवली. मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचे कपडे आणि सफाई कामगारांचे कपडे परिधान करुन ऋषी मोरे आणि त्याच्या एका साथीदाराने गांजा आणला.

पाच ते सहा जणांनी पैसे गोळा करून गांजा आणायला लावल्याचं ऋषी मोरेने सांगितलं. हा पर्वती परिसरात तावरे कॉलनीतील रहिवासी असल्याचं सांगत आहे.

हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काल रविवारी खडकवासला चेक पोस्टवर ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 188 त्याचबरोबर अमली पदार्थ कायद्याअंतर्गत आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार तरुणांनी पालिकेचा नवा ड्रेस शिवल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. हे तरुण एक पेंटर आणि बिगारी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

महत्त्वाचं म्हणजे या तरुणांनी गांजा कुठून आणला हा प्रश्न अधोरेखित होत आहे. लॉकडाऊनच्या काळातही पुण्यात अजूनही गांजा आणि अवैध धंदे सुरू असल्याचं उघड झालं आहे.

मनपाच्या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हे पठ्ठे गांजा आणण्यासाठी गेले होते. ज्याठिकाणी हे गांजा आणण्यासाठी गेले होते, तिथे गांजा घेणाऱ्यांची गर्दी होती असं हे दोन तरुण सांगतात. यावरुन पुण्यातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. गांजा मिळतो हे जितकं भीषण आहे, तितकंच मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून, आपण मनपा कर्मचारी असल्याचं भासवून असे कारनामे करणारेही धक्कादायक आहे.

Published On - 11:23 am, Mon, 13 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI