बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?

राहुल गांधी मित्रांसोबत दोन दिवसांसाठी जैसलमेरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येणार होते. | Rahul Gandhi

बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:11 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election results 2020) काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जैसलमेरमधील आपली हॉलिडे ट्रिप रद्द करावी लागल्याची माहिती आता समोर येत आहे. राहुल गांधी यांनी वैयक्तिक कारण सांगत ही ट्रिप रद्द केल्याचे समजत आहे. (Congress leader cancels holiday trip in Jaisalmer)

प्राथमिक माहितीनुसार, राहुल गांधी मित्रांसोबत दोन दिवसांसाठी जैसलमेरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येणार होते. बुधवारी सकाळी त्यांचे विमान जैसलमेरमध्ये दाखल होणार होते. ते पंचतारांकित सूर्यगढ फोर्ट हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती होती.

त्यासाठी हॉटेल प्रशासनाला व्हीआयपी मुव्हमेंटच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सूर्यगढ फोर्टमध्ये 10 लोकांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. राहुल गांधी एक रात्र सूर्यगढ हॉटेलमध्ये घालवणार होते. तर दुसरी रात्र ते वाळवंटातील तंबूत घालवणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी सूर्यगढ फोर्टमध्ये जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारी राहुल गांधी पुन्हा दिल्लीला जाणार होते.

त्यासाठी राहुल गांधी यांचे विमान आज सकाळी सहा वाजता जैसलमेरमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांना हा प्लॅन कॅन्सल करावा लागल्याची माहिती आता समोर येत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये प्रचारासाठी अवघ्या आठ सभा घेतल्या होत्या. राहुल गांधी वगळता राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बिहारच्या प्रचारात फारसा रस दाखवला नव्हता. याचा मोठा फटका महागठबंधनला बसला होता.

परिणामी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाची वेळ ओढावली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधी सुट्टी घालवण्यासाठी जैसलमेरला गेले असते तर काँग्रेसला आणखी टीकेचा सामना करावा लागला असता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ही ट्रिप रद्द केल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election ! हवा निर्माण करण्यात यशस्वी, तरीही पराभूत; बिहार निवडणुकीतील चर्चित चेहरे!

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

Mp By Election Result | दुधात साखर विरघळावी तसे ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले : शिवराज सिंह चौहान

(Congress leader cancels holiday trip in Jaisalmer)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.