वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद? मग फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करा, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून नंबर शेअर

रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद असल्यास त्या परिसरातील नागरिकांना त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करण्याचं आवाहन केलं आहे (Raigad Collector on block road and collapse trees).

वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद? मग फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करा, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून नंबर शेअर

पुणे : निसर्ग चक्रीवादळाने राज्यभरात अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलं. यात अनेक ठिकाणी झाडं कोसळून रस्ते बंद झाले, तर काही ठिकाणी झाडं पडून वीज यंत्रणा कोलमडली. यावर उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव हायटेक उपक्रम राबवला आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यात वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद असल्यास त्या परिसरातील नागरिकांना त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करण्याचं आवाहन केलं आहे (Raigad Collector on block road and collapse trees). यानंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तात्काळ संबंधित रस्ते मोकळे करणार आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडमधील या विद्ध्वंसानंतर तात्काळ तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून त्यांनी नागरिकांना आपआपल्या भागातील प्रश्न कळवण्याचं आवाहन केलं. तसेच तक्रार आल्यानंतर तात्काळ जिल्हा प्रशासन त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करेल, असं आश्वसनही त्यांनी दिलं.


नागरिकांनी पडलेल्या झाडांचे आणि बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाठवल्यानंतर त्या त्या भागातील जिल्हा प्रशासन यंत्रणा तत्काळ कामाला लागेल आणि ते रस्ते मोकळे करणार आहे. यासाठी निधी चौधरी यांनी हा हायटेक अभिनव उपक्रम राबवला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी पडलेल्या झाडांचे आणि त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो, व्हिडीओ 8275152363 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवण्याचं आवाहन केलं. तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलं. व्हॉटस्अॅप क्रमांकावर पडलेल्या झाडांचे, त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करायची आहे. यानंतर बंद झालेला संबंधित रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या  :

Cyclone Nisarga | मुख्यमंत्री रोरो बोटीने अलिबागला, नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा

Cyclone Nisarga | श्रीवर्धनमध्ये भिंत पडून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, जिल्ह्यातील दुसरी घटना

Nisarga Cyclone | चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात नेमकं किती नुकसान?

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळात 7 जणांचा जीव वाचवणारी खिडकी!

Raigad Collector on block road and collapse trees

Published On - 4:05 pm, Sat, 6 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI