Cyclone Nisarga | मुख्यमंत्री रोरो बोटीने अलिबागला, नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.

Cyclone Nisarga | मुख्यमंत्री रोरो बोटीने अलिबागला, नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा

मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार 5 जून) करणार आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडात मोठी वित्तहानी झाली आहे (CM Uddhav Thackeray Will Be On Inspection Tour) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून सकाळी साडेअकराच्या सुमारास रोरो बोटीने अलिबागला जाणार आहेत. तिथे नुकसान पाहणी दौरा करुन अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ते अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा : मुख्यमंत्री

निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे याबाबत आढावा घेतला होता. यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.

रायगड जिल्ह्यात घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचवणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवसरात्र काम करत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे. शिवाय, मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये स्थलांतरित केलेल्या नागरिकांना परत आणताना त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

“आपल्या नशिबामुळे या चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्वाचा मुद्दा असा की, पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत. पण, आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

CM Uddhav Thackeray Will Be On Inspection Tour

संबंंधित बातम्या :

Cyclone Nisarga | श्रीवर्धनमध्ये भिंत पडून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, जिल्ह्यातील दुसरी घटना

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळात 7 जणांचा जीव वाचवणारी खिडकी!

Cyclone Nisarga | कोकणात हाहा:कार, आंबा, फणस, सुपारीची झाडं जमीनदोस्त, अनेक घरांची पडझड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *