विधवेवर सामूहिक बलात्कार, आमदारासह मुलगा आणि भाच्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (rape case on bjp mla) उडाली आहे.

विधवेवर सामूहिक बलात्कार, आमदारासह मुलगा आणि भाच्यावर गुन्हा दाखल

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये भाजपचे आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला (rape case on bjp mla) आहे. पोलिसांनी रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (rape case on bjp mla) उडाली आहे.

वाराणसीतील एका पीडित महिलेने आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यावर विधानसभा निवडणुकी दरम्यान हॉटेलवर बोलावून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 10 फेब्रुवारी रोजी महिलेने आमदारावर हे आरोप केले होते.

“आमदार त्रिपाठी यांचा भाचा संदीप तिवारीने लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेने असेच आरोप आमदार आणि त्यांच्या मुलावरही केले आहेत, असं पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे”, अशी माहिती एसपी राम बदन सिंह यांनी दिली.

दरम्यान, हे सर्व आरोप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांनी फेटाळून लावले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


Published On - 7:30 pm, Wed, 19 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI